विजय पाटील
सांगली : मिरजेतील Miraj एका रेस्क्यू सेंटरवर वन्यप्राणी Wildlife आणि पक्षी Birds अवैधरित्या ठेवल्याप्रकरणी वनविभागाने छापा टाकला आहे. यामध्ये २६ घारी (एक मृतावस्थेत), घुबड, गाय, बगळा, कांडे करकोचा दोन, माकड दोन, कासव चार या प्राण्यांचा त्यामध्ये समावेश होता. वन विभागाने Forest Department ते प्राणी ताब्यात घेतले आहेत. The forest department released the animals and birds from captivity
मिरजेतील पार्श्वनाथ नगर Parshvanath Nagar येथील रेस्क्यू सेंटरवर अवैधरित्या प्राणी बाळगल्याची माहिती वनविभागास मिळाली होती. त्यानुसार फिरत्या पथकाने सेंटरवर छापा टाकला. त्यावेळी ३७ प्रकारचे वन्य पक्षी आणि प्राणी दिसून आले आहेत. १ घार मृतावस्थेत मिळून आली आहे. पशुसंर्वधन चिकित्सालयातील डॉ. सुतार, डॉ. डोके यांच्या टीमने प्राणी व पक्ष्यांची वैद्यकीय तपासणी केली आहे.
हे देखील पहा
बरेच प्राणी व पक्षी तंदरूस्त असून, काही पक्ष्यांची प्रकृती खालावल्याचे दिसून आले आहे. अशा प्राणी- पक्ष्यांना पुण्यातील वन्यप्राणी रेस्क्यू सेंटरकडे पाठविण्यात येणार असल्याचे वनविभागाने सांगितले आहे. उपवनसंरक्षक विजय माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक विजय गोसावी, वनक्षेत्रपाल युवराज पाटील यांच्यासह वनमजुरांचा कारवाईत सहभाग होता. The forest department released the animals and birds from captivity
वन्य प्राणी, पक्षी जखमी अवस्थेत आढळल्यास वन विभागाशी संपर्क करावा. कोणत्याही वन्यजीवास विनापरवाना बाळगणे कायद्याने गुन्हा आहे. असे दिसून आल्यास वन्यजीव अधिनियमानुसार कारवाई करण्यात येईल. असा इशारा उपवनसंरक्षक माने यांनी दिला आहे.
Edited By- Digambar Jadhav
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.