Tembhurni Police Station Saam Tv
महाराष्ट्र

लग्नाच्या नावाखाली फसवणूक करणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात

चार वधू सह दोन एजंटला अटक

लक्ष्मण सोळुंके

जालना - एकाच वेळी दोन वर पक्षाला एकच वधू पटल्याने वाद झाला, आणि लग्नाच्या नावाखाली फसवणुकीच करणाऱ्या टोळीचे विंग फुटल्याने दोन एजंट चार वधू टेंभुर्णी पोलिसांनी बेड्या ठोकल्याची घटना जाफ्राबाद तालुक्यातील सातेफळ गावात घडली आहे. सातेफळ गावात शेतात काही लोक संशयीत रित्या जमा झाल्याची माहिती टेंभुर्णी पोलिसांना लागली होती पोलीस (Police) शेतात दाखल होतच काही लोकांनी त्या ठिकाणाहून पळ काढण्याचा प्रयन्त केला.पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता हा संपूर्ण प्रकार समोर आला.

सविता माळ या महिलेने औरंगाबाद (Aurangabad) येथील काही मुलींना आणून जळगाव जिल्ह्यातील भडगाव व फुलंब्री येथील लग्नास इच्छुक दोन युवकांना लग्न लावुन देण्यासाठी दोन लाख रुपये घेवून लग्नासाठी त्यांच्या कुटुंबासह बोलावून घेतले, मात्र एकाच वेळी दोन्ही वर पक्ष समोरा- समोर आल्याने एकच वधू दोन्ही पक्षाला पसंद पडल्याने त्यांच्यात वाद झाला. या वादातून फसवणुक होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

हे देखील पाहा -

टेंभुर्णी पोलिसांनी या प्रकरणीं तात्काळ कारवाई करत हे रॅकेट चालवणाऱ्या सविता राधाकिसन माळी,अनिल राधाकिसन माळी,अनिल जगन्नाथ बनकर या एजंट सह सुनिता बाळू माळी,सुषमा सुभाष बेळगे, ,शिला मनोहर बनकर ,शितल बाबुराव निकम यांच्या विरुद्ध जळगाव येथील वर पक्षाकडील मंडळीला लग्न लावुन देण्याचे आमीष दाखवून फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करत अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीच्या मोबाईची तपासणी केली असता अनेक मुला-मुलींचे बायोडाटा फोटो आढळून आल्याने या टोळीने धुळे,औरंगाबाद,जळगाव,परभणी, नांदेड या शहरात अनेक लग्नास इच्छुक असलेल्या तरुणांची व त्यांच्या नातेवाईकांची आर्थिक फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे,मुख्य आरोपी सविता माळी ही फरार झाली असून टेंभुर्णी पोलीस तिचा शोध घेत आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind Vs Eng सामना उशिराने सुरु, पावसामुळे भारताची विजयाची संधी हुकणार?

Bogus Soyabean Seeds : पेरलेले सोयाबीन उगवलेच नाही; शेतकऱ्यांकडून सोयाबीनची दुबार पेरणी

Unmarried Bollywood Actress: 'या' प्रसिद्ध अभिनेत्रींनी अजून केलं नाही लग्न

Mahayuti: नवी मुंबईत राजकीय घडामोडींना वेग; अजित पवार गट महायुतीतून बाहेर पडणार?

Mumbai Shocking : लव्ह, समलैंगिक संबंध अन् १६ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू; मुंबईत अनोख्या प्रेमाचा धक्कादायक अंत

SCROLL FOR NEXT