दोन वेगवेगळ्या कारवाईमध्ये २५ मोटरसायकली जप्त; मोटरसायकल चोरीचे १८ गुन्हे उघड

एलसीबी, एमआयडीसी पोलिसांची कामगिरी
Latur News
Latur NewsSaam tv
Published On

लातूर - पोलिसांच्या दोन वेगवेगळ्या कारवाईमध्ये २५ मोटरसायकली जप्त केल्या असून मोटरसायकल चोरीचे १८ गुन्हे उघड झाले आहेत. तसेच १० लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. सदर कारवाई लातुरच्या (Latur) स्थानिक गुन्हे शाखा व एमआयडीसी पोलिसांनी केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस (Police) निरीक्षक गजानन भातलवंडे, एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात पोलीस स्टेशनला घडलेले मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्याकरिता पोलिस अधिकारी व अंमलदार यांना सूचना व मार्गदर्शन करण्यात आले होते.

हे देखील पाहा -

नवीन रेणापूर नाका परिसरात चोरीच्या मोटारसायकली खरेदी व विक्रीचा व्यवहार होणार आहे. अशी माहिती मिळताच पथकाने नवीन रेणापूर नाका परिसरात सापळा लावून चोरीच्या मोटरसायकल खरेदी-विक्रीचा व्यवहार करणाऱ्या व्यक्तींना ताब्यात घेतले. त्यांची विचारपूस केली असता पवनराज गुलाब चव्हाण, महादेव शिवाजी गरड उर्फ शुभम पाटील, अक्षय रावसाहेब देमगुंडे असे असल्याचे सांगितले. त्यांच्याकडे सखोल विचारपूस केली असता त्यांनी लातूर शहरातील विविध ठिकाणाहून तसेच जिल्ह्या बाहेरून मोटारसायकली चोरून ते एकत्र जमा करतात.

Latur News
कारखान्याच्या ढिसाळ कारभाराला वैतागून शेतकऱ्याने दीड एकर ऊस पेटविला

फेसबुकवर शुभम पाटील नावाचा फेसबुक अकाउंट ओपन केला असून त्यामार्फत जिल्ह्यातील विविध लोकांना मोटारसायकली विक्री करतात असे सांगितले. पोलिस चौकशी मध्ये त्यांनी विविध ठिकाणाहून चोरलेल्या व चोरी करून लपवून ठेवलेल्या ६ लाख ३८ हजार रुपयांच्या १७ मोटारसायकली स्थानिक गुन्हे शाखेने व ७ मोटरसायकली पोलिस ठाणे एमआयडीसीचे पोलिसांनी जप्त केले असून जप्त केलेल्या मोटारसायकली संदर्भाने लातूर जिल्ह्यात ८ गुन्हे, उस्मानाबाद जिल्ह्यात २ गुन्हे, सोलापूर जिल्ह्यात १ गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com