कारखान्याच्या ढिसाळ कारभाराला वैतागून शेतकऱ्याने दीड एकर ऊस पेटविला

शेतकऱ्याने आंबा गावातील आपल्या शेतात दीड एकर शेतावर उसाची लागवड केली होती.
Jalna Fire
Jalna FireSaam Tv
Published On

जालना - जिल्ह्यात यंदा अतिरिक्त ऊसाचा प्रश्न गंभीर झाला आहे. कारखान्याचे सभासद असून ही ऊसतोड न झाल्याने मेटाकुटीला आलेल्या संतप्त शेतकऱ्याने (Farmer) अक्षरश दीड एकर ऊसाला आग लावून त्यावर ट्रॅक्टरने रोट्या फिरवल्याची घटना परतूर तालुक्यातील आंबा गावात घडली आहे. मोहन ओंकार मुजमुले अस या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी आंबा गावातील आपल्या शेतात दीड एकर शेतावर उसाची लागवड केली होती.

हे देखील पाहा -

माँ बागेश्वरी साखर कारखान्याने त्यांच्या उसाची तोडणी ५ मे करण्याची स्लिप ही दिली, मात्र ऊसतोड टोळी न पाठवल्याने मुजमुले यांनी कारखान्याला विनंती करून ही टोळी मिळली नसक्याने व खाजगी ऊसतोड कामगारांकडून उसाच्या तोडणी करून देण्यासाठी प्रति एकर ६० हजाराची मागणी करण्यात आली.

Jalna Fire
भरधाव वाळूच्या टिप्परने दुचाकी व रिक्षाला चिरडले; एक ठार

या मेटाकुटीला आलेल्या मोहन ओंकार मुजमुले या शेतकऱ्यानी कारखान्याच्या ढिसाळ कारभाराला वैतागून अक्षरश दीड एकर उभ्या उसाच्या पिकाला आग लावून त्यावर ट्रॅक्टरने रोट्या फिरवला आहे.या नुकसानीला कारखाना चेरमन जबाबदार असल्याचा आरोप ही त्यांनी केला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com