अलिबागच्या चार वर्षीय बाल गिर्यारोहीकेने साडेपाच तासात सर केला गिरनार शिखर... राजेश भोस्तेकर
महाराष्ट्र

अलिबागच्या चार वर्षीय बाल गिर्यारोहीकेने साडेपाच तासात सर केला गिरनार शिखर...

जागतिक विक्रमवीर, बालगिर्यारोहक कु. शर्विका जितेन म्हात्रे हिने सलग चौथा विश्वविक्रम नोंदवून महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रायगड: अलिबागच्या चार वर्षीय बाल गिरीरोहक शर्वीका जितेन म्हात्रे हिने आपल्या शिरपेचात अजून एक विक्रम नोंदविला आहे. गुजरातमधील सर्वात उंच शिखर गिरनार सर केले आहे. शर्वीका हिने हे आव्हान साडेपाच तासात पूर्ण केले आहे. गिरनार शिखर सर करणारी अलिबागची शर्वीका ही भारतातील पहिली कन्या ठरली आहे. (A four-year-old child climber from Alibag climbed Girnar hill in five and a half hours)

हे देखील पहा -

जागतिक विक्रमवीर, बालगिर्यारोहक कु. शर्विका जितेन म्हात्रे हिने सलग चौथा विश्वविक्रम नोंदवून महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. तिच्या या यशाने अलिबाग, रायगडसह देशाचे नाव उंचावले आहे. अलिबाग तालुक्यातील लोणारे हे शर्वीका हिचे गाव. अडीच वर्षांपासून शर्वीका हिला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रति प्रेम निर्माण झाल्याने तिने आई-वडिलांसोबत गड, किल्ले सर करण्यास सुरुवात केली. शर्वीका हिने महाराष्ट्रातील माथेरानमधील कठीण सुळका (कलावंतीण) वयाच्या अवघ्या अडीजाव्या वर्षात, सर्वात उंच किल्ला नाशिक मधील (साल्हेर) तिसऱ्या वर्षात, तर सर्वात उंच शिखर (कळसुबाई) साडेतीन वर्षांची असताना ह्या मोहिमा तिने यशस्वी पादाक्रांत केल्या आहेत.

गिरनार पर्वत सर करून पुन्हा एकदा आपल्या कामगिरीची झलक दाखवून चौथ्या विक्रमांसोबत सलग अकराव्यांदा रेकॉर्डस् बुकमध्ये आपले नाव नोंदविले आहे. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड तीन वेळा, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड तीन वेळा, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन दोन वेळा तर ओ माय गॉड आणि डायमंड बुक रेकॉर्ड अशी दहा रेकॉर्ड तिच्या नावावर आहेत. तर आता सर केलेल्या गिरनार मोहिमेची इंडिया बुक ऑफ रेकोर्ड मध्ये नोंद होणार आहे.

कोजागिरी पौर्णिमा आणि हिरकणीचा इतिहास डोळ्यासमोर ठेऊन शर्वीका हिने कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने दिनांक १९ ऑक्टोबर २०२१ रोजी गुजरात मधील सर्वोच्च शिखर गिरनार सर करून एक नवा इतिहास महाराष्ट्राच्या नावावर नोंदविला आहे. समुद्र सपाटीपासून सुमारे ३५०० फूट उंचीवर वसलेल्या गिरनारच्या गुरुशिखर ह्या सर्वोच्च स्थानी पोहोचण्यासाठी पायथ्यापासून सुमारे १०,००० (दहा हजार) पायऱ्यांचा टप्पा पार करावा लागतो, घरापासून सुमारे ८५० किलोमीटरचे अंतर, १७ तासांचा प्रवास, रात्रीचा जंगल प्रवास, पहाटेची बोचरी थंडी, ह्या सर्व अडथळ्यांवर मात करत शर्विकाने सुमारे साडेपाच तासांच्या अथक परिश्रमानंतर गुजरातमधील सर्वोच्च शिखर गिरनारवर महाराष्ट्राचा स्वराज्य ध्वज आणि भारताचा राष्ट्र ध्वज फडकावला आहे. एवढे उंच शिखर चढून जाणारी शर्विका ही भारतातील सर्वात पहिली, सर्वात लहान कन्या ठरली आहे. तिच्या ह्या कामगिरीमुळे महाराष्ट्राचे नाव पुन्हा एकदा गुजरातसह भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे.

आपल्या बारा जणांच्या टीमसह शर्विकाने दिनांक १८ ऑक्टोबर २०२१ च्या रात्री १०.३० वाजता आपल्या प्रवासाला सुरुवात केली, आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी पहाटे ४ वाजता गिरनार शिखरावर राष्ट्र ध्वज आणि स्वराज्याची भगवी पताका फडकावली. तिच्या ह्या कामगिरीमुळे गिर्यारोहण क्षेत्रात पुन्हा एकदा सर्वात लहान वयात तिने आपले नाव अधोरेखित केले आहे. तिच्या ह्या कामगिरीची चर्चा आणि कौतुक रायगड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात होत आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT