गीतकार सुरेश वाडकर यांच्या हस्ते भु - माफिया या लघुपटाचे लोकार्पण सागर गायकवाड
महाराष्ट्र

गीतकार सुरेश वाडकर यांच्या हस्ते भु - माफिया या लघुपटाचे लोकार्पण

नाशिक पोलीस आयुक्त यांच्या संकल्पनेतून भु-माफिया या लघुपटाचे लोकार्पण पद्मश्री गीतकार सुरेश वाडकर यांच्या हस्ते नाशिक पोलीस आयुक्त कार्यालयात करण्यात आले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सागर गायकवाड

नाशिक : नाशिक पोलीस आयुक्त यांच्या संकल्पनेतून भु-माफिया या लघुपटाचे लोकार्पण पद्मश्री गीतकार सुरेश वाडकर यांच्या हस्ते नाशिक पोलीस आयुक्त कार्यालयात करण्यात आले. हा लघुपट सत्य घटनेवर आधारित आहे असे पोलीस आयुक्त यांनी सांगितले. तसेच याप्रसंगी त्यांनी आवाहन केले की, कुठेही असा प्रकार घडत असेल तर आमच्याकडे या आणि एफआयआर नोंदवा, आम्ही कारवाई करू आणि तुम्हाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू. ह्या लघुपटात काम करणाऱ्या कलाकारांसोबत खरे-खुरे पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांनी देखील या लघुपटात काम केलं केलं आहे. (a film by nashik police named bhu - mafia is inaugurated by singer suresh wadkar)

हे देखील पहा -

काही महिन्यांपूर्वी नाशिक येथील गंगापूर रोड येथे एका जागेवर भु-माफियांनी कब्जा केला होता. त्यासंदर्भात जागा मालकाने पोलीस तक्रार केली म्हणून दिवसा-ढवळ्या गळ्याला चाकू मारून भु-माफियांनी मालकाची निर्घृणपणे हत्या केली होती. तेव्हा काही दिवसांतच हत्येचा छडा लावत नाशिक पोलिसांनी त्या भु-माफियांवर कारवाई केली आणि त्यांना मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल केला, त्यावरच हा लघुपट तयार करण्यात आला आहे.

सुरेश वाडकर यांची देखील फसवणूक 11 वर्षांपूर्वी झाली आहे असं सुरेश वाडकरांनी सांगितले. नाशिक येथील देवळाली कॅम्प ह्या ठिकाणी त्यांनी जागा खरेदी केली होती आणि त्यांच्या एका मित्रांने ही जागा दाखवून मध्यस्ती केली होती, पण त्या भु-माफियांमध्ये तो मित्र देखील शामिल होता अस त्यांनी सांगितलं. मला ज्यावेळस कळालं तेव्हा मी अनेक अधिकाऱ्यांना सांगितलं की, असा प्रकार माझ्या बरोबर घडला आहे पण मला अधिकाऱ्यांनी मदत केली नाही उलट करतो अस सांगून आश्वासन दिलं.

मी मोठ्या-मोठ्या व्यक्तींना देखील भेटलो पण काहीच झालं नाही. त्यांनी प्रशासनावर आपली नाराजी देखील यावेळी व्यक्त केली. 1 वर्ष झालं आहे, पोलीस आयुक्त दीपक पांडे हे ह्या संदर्भात पूर्ण पाठपुरावा करत आहे आणि मला खात्री आहे की, मला न्याय मिळेल असंही सुरेश वाडकर म्हणाले. याप्रसंगी त्यांनी पोलीस आयुक्तांसाठी गाणे देखील गायले.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

7 Grain Bhakri: वजन कमी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज खा ७ धान्यांची भाकरी; मिळताता हे आरोग्यादायी फायदे

SCROLL FOR NEXT