ही मदत म्हणजे सर्व थरांतील पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न

पूर, दरड समस्येवर कायमस्वरूपी उपाय करणार
ही मदत म्हणजे सर्व थरांतील पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न
ही मदत म्हणजे सर्व थरांतील पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न Saam tv news
Published On

नवी मुंबई : गेल्या दीड वर्षात महाराष्ट्रात वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्ती (Natural disasters) आल्या असून कोविडचे संकट असतानादेखील आपत्ती ग्रस्तांना राज्य सरकारने वार्‍यावर न सोडता मदत केली आहे. आजही ११ हजार ५०० कोटींच्या निधीला मान्यता देऊन राज्य सरकार पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न करीत आहे. अशी भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी व्यक्त केली आहे. (We are helping towards each and every flood victim, says Maharashtra CM Uddhav Thackeray)

ही मदत म्हणजे सर्व थरांतील पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न
दंड भरतो, पण मास्क नाही लावणार!

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, नैसर्गिक आपत्तीमुळे राज्याचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी, व्यापारी, व्यावसायिक, दुकानदार, सर्वसामान्य नागरिक, कारागीर सर्वांनाच याची झळ बसली आहे. त्यामुळेच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नेहमीच्या निकषापेक्षा वाढीव दराने मदत करण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे.

आज राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी राज्यसरकारने नैसर्गिक आपत्तीग्रस्तांसाठी ११५०० कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी मदतीशी संबंधित अधिकाऱ्यांना काही सुचनाही दिल्या.

- पूर, दरड समस्येवर कायमस्वरूपी उपाय करा.

- कोकणातील बांधकामाधीन प्रकल्प येत्या ३ वर्षात पूर्ण करा.

- कोयना टेलरेस पाणी मुंबई लिंक प्रकल्पासाठीच्या डीपीआरवर अभ्यास करुन ३ महिन्यात निर्णय घ्या.

- तज्ञ व प्रशासकांची समिती नेमून ३ महिन्यात अहवाल द्या.

-पूराचे संकट, दरडी कोसळण्याच्या घटना यावर तातडीने कारवाई करण्याच्या करा.

- महाड व चिपळूण शहरातील पुर नियंत्रणासाठी तज्ञ समितीच्या अहवालानुसार वशिष्टी, गांधारी, सावित्री नद्यातील वेट व गाळा काढून मॉडेल स्टडीच्या आधारे पुर संरक्षण भिंत ३ वर्षात पूर्ण करा.

- डोंगर कोसळण्याच्या घटना पुन्हा न होण्यासाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली तज्ञ व प्रशासकांची समिती नेमून ३ महिन्यात अहवाल तयार करा.

- कोकणाच्या २६ नदी खो-यात पूर इशारा देणारी आरटीडीएस प्रणाली ३ महिन्यात बसवा.

Edited By- Anuradha

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com