Beed Crime News Updates
Beed Crime News Updates saam tv
महाराष्ट्र

"माझ्या नवऱ्याला फोन का करतेस", म्हणत महिलेकडून नर्सला ऊसाने मारहाण

विनोद जिरे

बीड: " माझ्या नवऱ्याला फोन का करतेस, तुझा नंबर दे " असे म्हणत बीडमधील (Beed) खासगी रूग्णालयातील एका 30 वर्षीय नर्सला, एका महिलेने ऊसाने (Sugarcane) मारहाण केली आहे. ही घटना बीड शहरातील जिजामाता चौकात असणाऱ्या, एका खाजगी हॉस्पिटलमध्ये (hospital) घडली. याप्रकरणी सदर नर्सने दिलेल्या फिर्यादीवरून, शारदा बाळू कुलथे या विवाहित महिलेविरोधात, बीड शहर ठाण्यात कलम 223, 504, 506 भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान चक्क हॉस्पिटलमध्ये ऊसाने मारहाणीची (beating) घटना घडल्याने बीड शहरात खळबळ उडाली आहे.

हे देखील पहा-

पोलिसांनी (police) दिलेल्या माहितीनुसार नाळवंडी नाका परिसरात वास्तव्यास असलेली एक 30 वर्षीय नर्स, शहरातील जिजामाता चौकातील एका खासगी रूग्णालयात काम करते. यादरम्यान आरोपी माहिला सदर रूग्णालयात आली व म्हणाली, येथे आमुक आमुक नर्स कोण आहे? याची विचारणा करून आरोपी महिला त्या नर्सजवळ गेली. " तु माझ्या नवऱ्याला फोन का करतेस , तुझा नंबर मला दे , असे आरोपी महिलेने म्हटले, त्यावर मी तुम्हाला नंबर देणार नाही, असे त्या नर्सने यावेळी सांगितले .

या सगळ्या गोष्टीचा राग मनात धरून आरोपी महिलेने त्या नर्सला, हातातील ऊसाने मारहाण करण्यास सुरूवात केली. घडलेल्या या घटनेमुळे सदर रूग्णालयात काही तास तणावाचे वातावरण होते. याप्रकरणी सदर नर्सने बीड शहर ठाण्यात तक्रार दाखल केली असून आरोपी महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात राज ठाकरेंची सभा झाली तर आनंदच: श्रीकांत शिंदे

Maharashtra Politics: नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरेना? ठाकरेंच्या उमेदवाराची घौडदौड सुरुच

Maharashtra Politics 2024 : काँग्रेसचा विश्वजीत पैलवानासोबत; चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय

Maharashtra Politics 2024 : माढ्याच्या मैदानात फडणवीसांचा डबल धमाका; मोहिते- पवारांच्या गटात लावला सुरुंग

Health Tips: लसणाचे पाणी पिण्याचे फायदे ऐकून आजपासूनच प्यायला कराल सुरूवात

SCROLL FOR NEXT