जिल्हा परिषद शिक्षकाला अपहरण करून लुटले, कल्याणमधील धक्कादायक प्रकार

कल्याणमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Kalyan Crime
Kalyan Crimeप्रदीप भणगे
Published On

कल्याण: कल्याणमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षकाला अपहरण करून लुटल्याची घटना समोर आली असून जगदीश पवार असे या शिक्षकाचे नाव आहे. बँक खात्यातील (bank account) पैसे, खिशातील पैसे आणि गळ्यातील चैन काढून 3 आरोपी पसार झाले आहेत. याबाबत कल्याण (Kalyan) पूर्वेतील कोळसेवाडी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या मलंगगड भागातील ढोके केंद्रावर जगदीश पवार हे शिक्षक आहेत. बुधवारी सकाळी नियमितपणे ते आपल्या कल्याण पश्चिमेतील घरून ढोके जिल्हा परिषदेच्या शाळेत जात होते.

हे देखील पहा-

मात्र, सकाळी कल्याण पूर्वेतील नांदीवली परिसरात आरोपी प्रथमेश वाकुर्ले हा तरुण घरी जाण्यासाठी शिक्षक जगदीश पवार यांना हात करू लागला. शिक्षकाने देखील ओळखीचा तरुण असल्याने त्याना ढोके गावात जाण्यासाठी आपल्या चारचाकी वाहनात प्रवेश दिला. यानंतर काही अंतरावर आरोपी प्रथमेश याने २ साथीदारांना शिक्षकाच्या गाडीत घेतले. त्यानंतर या अपहरण कर्त्यांनी आपल्या कामाला सुरुवात करत शिक्षक जगदीश पवार यांना महिलेशी संबंध असल्याच्या जाब विचारण्यासाठी तिच्या मामाकडे घेऊन जात होते. पुढे गेल्यावर त्यांच्या गळ्याला चाँपर लावून त्यांना बदलापूर परिसरातील मुळगावच्या जंगलात घेऊन गेले. त्यांनी शिक्षकाला कच्ची दारू पाजून त्याच्या खिशातील पैसे गळ्यातील सोन्याची चैन काढून घेतले आहे. फोन पे द्वारे पैसे ट्रान्स्फर करून घेतले.

Kalyan Crime
घराजवळ थुंकल्याने अल्पवयीन मुलाचा खून; मुंब्य्रातील धक्कादायक घटना

तसेच गळ्याला चाँपर लाऊन धार्मिक तेढ होतील अश्या आणि महिलांना त्रास होतील असे व्हिडिओ तयार केल्या आणि पोलिसात तक्रार केली तर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी या अपहरण कर्त्यांनी दिली होती. मात्र, तक्रार करणार नाही असे सांगितल्यानंतर शिक्षकाला पुन्हा कल्याण परिसरात सोडण्यासाठी हे तिघे जण निघून पसार झाले आहे. दरम्यान झालेल्या घटनेची माहिती शिक्षक पवार यांनी आपल्या मित्रांसह पोलिसांना दिलीं. पोलिसांनी (Police) देखील तातडीने तपासाला सुरुवात करत घटनास्थळी भेट देत प्रकरण जाणून घेत गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये मुख्य सूत्रधार हा ढोके गावात राहणारा प्रथमेश नानु वाकुर्ले, कुंभार्ली गावामधील सराईत गुन्हेगार प्रदीप खापरा याच्या सह अन्य एक जण आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com