अखेर सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष बदलाबाबतचा निर्णय झाला ! विजय पाटील
महाराष्ट्र

अखेर सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष बदलाबाबतचा निर्णय झाला !

अध्यक्ष बदलाबाबत भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये एकमत झाले आहे.

विजय पाटील

सांगली : अखेर सांगली जिल्हा परिषदेच्या Sangli Zilla Parishad अध्यक्ष बदलाबाबत भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये एकमत झाले आहे. येत्या 2 दिवसांमध्ये सर्व मित्र पक्षाना घेऊन निर्णय घेणार असल्याची माहिती भाजप ग्रामीण जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख Prithviraj Deshmukh यांनी माहिती दिली आहे. त्यामुळे पुढचा अध्यक्ष कोण असणार हे मात्र अजून गुलदस्त्यात आहे. (A decision was taken to change the president of Sangli Zilla Parishad)

आज सांगलीत जिल्हा परिषद अध्यक्ष बदलाबाबत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक संपन्न झाली यावेळी अध्यक्ष बदला बाबत निर्णय झाला आहे. यावेळी या बैठकीत भाजपचे खासदार संजयकाका पाटील, आमदार गोपीचंद पडळकर MLA Gopichand padalkar, आमदार सुरेश खाडे Suresh Khade, आमदार शिवाजीराव नाईक Shivsejirao Naik,  मकरंद देशपांडे, निशिकांत पाटील ग्रामीण जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, निताताई केळकर, जिल्हापरिषद सदस्य आदी सह सर्व कोअर कमिटी सदस्य उपस्थित होते.

गेली अनेक दिवस काही जिल्हा परिषद सदस्य नाराज होते. अध्यक्ष बदलाबाबत बैठक होत होती. मात्र निर्णर्य होत नव्हता मात्र आज झालेल्या बैठकीत जिल्हा परिषद अध्यक्ष बदलाबाबत सर्व कोअर कमिटी सदस्यचे एक मत झाले असून लवकरच बाकीच्या सर्व मित्र पक्षाची बैठक घेऊन अध्यक्ष बदलणार असल्याची माहिती भाजपा जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी माहिती दिली.

Edited By - Jagdish Patil

Highest Grossing Movies : 2025मध्ये 'छावा' चा बोलबाला, सर्वाधिक कमाई करणारे 5 चित्रपट कोणते?

Maharashtra Live News Update: नागपूरमध्ये भरधाव कार नदीत कोसळली, एकाचा मृत्यू

Smartphone Effects: स्मार्टफोनचा झोपेवर दुष्परिणाम! झोपण्यापूर्वी फोन वापरल्याने घटते झोपेचे हार्मोन?

Migraine Solution : मायग्रेनने त्रस्त आहात? या जपानी ट्रिकने मिळेल आराम

Aurangabad Tourism : पावसाळ्यात औरंगाबादची सफर; ही 7 Hidden ठिकाणे तुम्ही पाहिली का?

SCROLL FOR NEXT