Case Filed Against Sanjay Raut : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. कारण, संजय राऊत यांच्याविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे गटाचे नेते योगेश बेलदार यांच्या तक्रारीवरून नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Sanjay Raut Latest News)
संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल
केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) शुक्रवारी शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह यावर एकनाथ शिंदे यांचाच अधिकार असल्याचा निकाल जाहीर केला. या निकालानंतर ठाकरे गट प्रचंड आक्रमक झाला. यानंतर संजय राऊत यांनी पत्रकारपरिषद घेत एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केलेली शिवसेना गद्दारांनी चोरली असा, घणाघात खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटावर केला. इतकंच नाही तर शिवसेनेचं चिन्ह आणि नाव पळवण्यासाठी २ हजार कोटी रुपयांमध्ये सौदा झाला होता, असा आरोपही संजय राऊत यांनी केला होता.
दरम्यान, संजय राऊत यांच्या पत्रकारपरिषद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) यांच्याबद्दल चाटूगिरी असा शब्द वापरला. तसेच त्यांनी पत्रकारपरिषदेत मुख्यमंत्र्यांची बदनामी सुद्धा केली, असा आरोप शिंदे गटाचे शिंदे गटाचे नेते योगेश बेलदार यांनी केला आहे.
याबाबत त्यांनी नाशिकच्या (Nashik) पंचवटी पोलिसांत तशी तक्रार सुद्धा दाखल केली. दरम्यान, त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी खासदार संजय राऊत यांच्याविरोधात कलम ५०० अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.