Old Pension Scheme Employee Strike
Old Pension Scheme Employee Strike Saam TV
महाराष्ट्र

Employee Strike : सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपात मोठी फूट; या फेडरेशनची माघार, आजपासून कामावर रुजू होणार

Satish Daud-Patil

Old Pension Scheme Employee Strike : जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी राज्यातील शासकीय कर्मचारी संपावर गेले आहेत. या संपामुळे राज्यातील प्रमुख शहरातील प्रशासकीय यंत्रणा खोळंबल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसला. अशातच संप सुरू होऊन दोन दिवसाचा कालावधी उलटलेला असतानाच संपात फूट पडल्याचं दिसून येत आहे. ठाणे आणि सोलापूर पाठोपाठ आणखी एका कर्मचारी संघटनेनं संपातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. (Latest Marathi News)

महाराष्ट्र राज्य महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद कामगार-कर्मचारी संघटना फेडरेशन यांनी संपातून माघार घेतली आहे. या संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी संपावर न जाता केवळ काळ्या फिती लावून काम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं कर्मचाऱ्यांच्या एकजुटीला मोठा धक्का बसल्याचं दिसून येत आहे.  (State Government

दरम्यान, फेडरेशनने याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रद्वारे कळवलं आहे. महाराष्ट्र राज्य महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद कामगार-कर्मचारी संघटना फेडरेशन यांनी १४ मार्च २०२३ रोजी पुकारलेल्या संपाबाबत दिनांक २८ फेब्रुवारी २०२३ आपणास संपात सहभागी होणार असल्याचं पत्राद्वारे कळवलं होतं. त्यानुसार फेडरेशनने १४-१५ मार्च रोजी काळ्या फिती लावून संपात सहभाग घेतला.

आज कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दुरध्वनीवरून चर्चा झाली. त्यांनी फेडरेशनला पाठवलेल्या पत्रानुसार लवकरच फेडरेशन पदाधिकाऱ्यांना चर्चेकामी वेळ देण्याचं ठरवलं असून याबाबत तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं आहे. त्या अनुशंगाने आमची राज्यातील प्रतिनिधींशी चर्चा झाली असून उद्या दिनांक १६ मार्च २०२३ पासून राज्यातील महापालिकेतील सर्व कर्मचारी प्रत्यक्ष काम बंद न करता काळ्या फिती लावून सेवा देतील, असं फेडरेशनने आपल्या पत्रात म्हटलं आहे.

दरम्यान, राज्य  सरकारी कर्मचारी संपावर गेल्यामुळं सामान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये सरकारी कार्यालयं ओस पडल्यामुळं प्रशासकीय कामकाज खोळंबलेलं आहे. याशिवाय अनेक जिल्ह्यांमध्ये रुग्णालयातील कर्मचारी देखील संपात सहभागी झाल्यामुळं त्याचा मोठा फटका रुग्णांना सहन करावा लागत आहे. त्यामुळं आता शिंदे-फडणवीस सरकारनं तातडीनं कर्मचारी संघटनांशी चर्चा करून जुन्या पेन्शन योजनेबाबत तोडगा काढण्याची मागणी केली जात आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : प्रचाराच्या शेवटच्या दिवशी इचलकरंजीत प्रचंड तणाव

Jayant Patil On Election Campaign | सभांना गर्दी कशी होते? जयंत पाटील काय म्हणाले?

Palak Tiwari: श्वेताच्या लेकीचं ट्रेडिशनल सौंदर्य; चाहते घायाळ!

Bald Benefits: जबरदस्त! टक्कल करण्याचे फायदेच फायदे

Perfume Hacks: परफ्यूम जास्त वेळ टिकण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

SCROLL FOR NEXT