Beed Latest Crime News  Saam TV
महाराष्ट्र

Beed News: लग्नापूर्वीचे प्रेमसंबंध तुझ्या नवऱ्याला सांगेल; ब्लॅकमेल करत ३५ वर्षीय विवाहितेवर अत्याचार, बीडमधील घटना

Beed Crime News: लग्नापूर्वीचे प्रेमसंबंध, तुझ्या नवऱ्याला सांगून संसार उद्ध्वस्त करीन,अशी धमकी देत एका नराधमाने ३५ वर्षीय विवाहितेवर सलग ७ वर्ष अत्याचार केला.

विनोद जिरे

Beed Latest Crime News

लग्नापूर्वीचे प्रेमसंबंध, तुझ्या नवऱ्याला सांगून संसार उद्ध्वस्त करीन, अशी धमकी देत एका नराधमाने ३५ वर्षीय विवाहितेवर सलग ७ वर्ष अत्याचार केला आहे. बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्रमोद मुंजा पराड (रा. शिक्षक कॉलनी, मंजरथ रोड) असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित ३५ वर्षीय विवाहितेचे लग्न झालेलं असून ती बीडच्या माजलगाव तालुक्यात राहते.

आरोपी आणि पीडितेचे लग्नापूर्वी प्रेमसंबंध होते. मात्र, लग्नानंतर पीडितेने आरोपीसोबत संबंध तोडले. मात्र, आपले तुझ्या लग्नापूर्वीचे प्रेमसंबंध, तुझ्या नवऱ्याला सांगून संसार उद्ध्वस्त करीन, अशी धमकी देत आरोपीने पीडितेला ब्लॅकमेल करणे सुरू केले.

इतकंच नाही, तर तिला शारीरिक संबंधासाठी देखील प्रवृत्त केले. २०१६ पासून आरोपीचे हे कृत्य सुरू होते. अखेर आरोपीच्या कृत्याला कंटाळून पीडितेने पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलिसांनी आरोपी प्रमोद मुंजा याच्यावर गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू केला आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed : जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यासाठी नारायण गडावर जय्यत तयारी | VIDEO

Maharashtra Live News Update: दसरा मेळाव्याच्या तोंडावर मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल

RSS @100 years : मीनाक्षीपुरम ते रामजन्मभूमी; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी प्रवास, समाजामुळे यशस्वी वाटचाल

Dussehra 2025: रावण दहनाची राख घरात ठेवण्याचे खास उपाय, मिळेल धनलाभ आणि यश

Pune Crime: निलेश घायवळ अन् टोळीला पोलिसांचा मोठा दणका; १० बँक खाती गोठवली, प्रॉपर्टीसुद्धा सील

SCROLL FOR NEXT