Beed News: जमिनीच्या वाढीव मोबदल्यासाठी थेट कोर्टाच्या निकालाची पानेच बदलली; बीडमधील धक्कादायक प्रकार

Bead Latest News: पाझर तलावात गेलेल्या जमिनीचा वाढीव मोबदला मिळावा यासाठी थेट कोर्टाच्या निकालाची पानेच बदलली गेली असल्याचा धक्कादायक प्रकार बीडमधून उघडकीस आला आहे.
Beed Crime News
Beed Crime NewsSaam TV
Published On

Bead breaking news

पाझर तलावात गेलेल्या जमिनीचा वाढीव मोबदला मिळावा यासाठी थेट कोर्टाच्या निकालाची पानेच बदलली गेली असल्याचा धक्कादायक प्रकार बीडमधून उघडकीस आला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाचा निकालाची पानेच बदलल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Beed Crime News
JN.1 Covid Cases: ठाणे, पुण्यापाठोपाठ नाशिकमध्येही जेएन.१ व्हेरिएंटचा शिरकाव? संशयित रुग्ण आढळल्याने खळबळ

मिळालेल्या माहितीनुसार, गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका येथील, पाझर तलावाच्या संपादित जमिनीचा तक्रारदाराला भूसंपादन अधिकाऱ्यांनी मावेजा मंजूर केला होता. बीड जिल्हा न्यायालयाने या मावेजाच्या प्रकरणात 2016 साली निर्णय दिला. मात्र त्यानंतर यातील 6 पानेच बदलण्यात आली आहेत.

हा प्रकार 2016 ते 2022 या काळात घडला असल्याचं समोर आलंय. सहायक सरकारी वकील यांनी हा प्रकार निदर्शनास आणून दिला. त्यानंतर न्यायालयाच्या वतीने कार्यालयीन अधीक्षक नरेंद्र पाठक यांनी बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात धाव घेत अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला.

यामुळे झाला उलगडा

निकालाच्या प्रतीचा कागद हा जाड असतो. यामध्ये वाढीव मावेजाची रक्कमही लिहिण्यात आली होती. परंतु, नंतर सहायक सरकारी वकिलांनी या प्रकरणातील प्रमाणित प्रतीची मागणी केली. त्यानंतर या निर्णयातील पान क्रमांक 9, 10, 17, 19, 20 व 25 हे बदलल्याचे दिसले.

पाने बदलणारे कोण ?

न्यायालयाच्या निकालात फेरफार करणे ही अतिशय गंभीर बाब आहे. सामान्य व्यक्ती अशी हिंमत करू शकत नाही, यात न्यायालयातीलचं काही व्यक्तींचा समावेश असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

त्यानुसार आता पोलिस तपास करत आहेत. हा निकाल बदलण्यासाठी आर्थिक उलाढाल झाल्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

नुकसान भरपाईच्या नाराजीने जास्तीचा मावेजा मिळावा, यासाठी पाच प्रकरणे दाखल करण्यात आली होती. त्यानुसार 2 जुलै 2016 रोजी तत्कालीन सहदिवाणी न्या. व स्तर न्या. साजिद आरेफ सय्यद यांनी ही प्रकरणे निकाली काढली आहेत.

Edited by - Satish Daud

Beed Crime News
Breaking News: फ्रान्समध्ये अडकून पडलेल्या २७६ भारतीयांची सुटका; ४ दिवसानंतर विमान मुंबईत परतले

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com