पर्यावरण बचावासाठी प्रणालीचा 9,500 किमीचा प्रवास
पर्यावरण बचावासाठी प्रणालीचा 9,500 किमीचा प्रवास  विजय पाटील
महाराष्ट्र

पर्यावरण बचावासाठी प्रणालीचा 9,500 किमीचा प्रवास

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विजय पाटील

पर्यावरण बचावाचा (Save Environment) संदेश घेऊन सायकलवरून एक युवती महाराष्ट्र भर भ्रमंतीला निघाली आहे. प्रणाली चिकटे (Pranali Chikate) असं या पर्यावरण संवर्धन यात्रीचे नाव आहे. साडे नऊ हजार किलोमीटरचा प्रवास करून ती सध्या सांगलीत पोहचली आहे. तिचे स्वागत सांगलीमध्ये करण्यात आले.

यवतमाळ जिल्ह्यातल्या पुनवट या छोट्याशा गावातून पर्यावरण प्रेमी प्रमिला चिकटे या तरुणीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश घेऊन महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. 28 ऑक्टोबर 2020 रोजी प्रणाली चिकटे हिने सायकलवरून एकटीने प्रवास सुरु केला. यवतमाळमधून प्रणालीने हा प्रवास सुरु केला. नागपूर, अमरावती, नाशिक, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर असा 21 जिल्ह्याचा सायकलवरून प्रवास करत सांगलीत पोहचली आहे. तब्बल साडे नऊ हजारांचा प्रवासाचा टप्पा प्राणिलीने पार केला आहे.

बदलती जीवनशैली त्यामुळे पर्यावरणाचा होत चाललेला ऱ्हास, याबाबत समाजात जागृती आणि बदलत्या पर्यावरणाचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने प्रणीलीने ही पर्यावरण संवर्धन बचाव यात्रा सुरू केली आहे. सांगलीतुन प्राणिल ही पुणे, मुंबई, अहमदनगर मार्गे ती 31 डिसेंबर आपल्या वाढदिवशी यवतमाळच्या आपल्या गावी पोहचणार आहे. गेल्या नऊ महिन्यांपासून प्रणालीचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश पोहचवण्याचे काम करत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Live Breaking News : हरियाणात भाजपला मोठा धक्का; अपक्ष आमदारांनी समर्थन घेतल मागे

Vastu Tips On Mobile: मोबाईलवर ठेवा हे वॉलपेपर, नशीब बदलेल

Harshaali Malhotra : बजरंगी भाईजानच्या 'मुन्नी'ला आता पाहिलं का?, ओळखणं ही झालंय कठीण

Ramdev Baba : रामदेव बाबा यांना सुप्रीम कोर्टाचा झटका; न्यायालयाने पुन्हा याचिका फेटाळली, IMA च्या अध्यक्षांनाही बजावली नोटीस

Rupali Chakankar News : रुपाली चाकणकरांना ईव्हीएमची पुजा भोवणार?

SCROLL FOR NEXT