Zilla Parishad school Closed : सरकार जिल्हा परिषद शाळांना टाळं ठोकण्याच्या तयारीत आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा कणा असलेल्या जिल्हा परिषद शाळा. याच जिल्हा परिषद शाळांच्या आवारात विद्यार्थ्यांचा किलबिलाट असायचा. मात्र आता जिल्हा परिषद शाळा ओस पडल्यात. अमरावती जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पटसंख्या घसरल्याने तब्बल 8 शाळांना टाळं ठोकण्यात आलंय....मात्र विद्यार्थ्यांची पटसंख्या घसरण्याची कारणं काय आहेत? पाहूयात.... (Why Are ZP Schools in Maharashtra Struggling?)
मिशन वात्सल्य अभियानाच्या माध्यमातून रस्त्यावरच्या आणि बेघर मुलांसाठी अभियान राबवण्यात येतंय.. मात्र दुसरीकडे 4 वर्षात तब्बल 17 हजार 348 विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळेकडे पाठ फिरवलीय.. मात्र फक्त अमरावती विभागात पटसंख्येत कशी घट झालीय? पाहूयात....
पटसंख्या घटली, शाळांना टाळं
2021-2023 दरम्यान 6 हजार विद्यार्थ्यांची जिल्हा परिषद शाळेकडे पाठ तर पटसंख्येअभावी 4 शाळांना टाळं
2023-2025 दरम्यान 10 हजार 727 विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळा सोडली.... तर पटसंख्या कमी असल्याने 4 शाळा बंद कऱण्यात आल्या.
अमरावती विभागात 4 वर्षात 17 हजार 348 विद्यार्थ्यांची घट तर 8 शाळांना टाळं ठोकलं.
विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यासाठी शिक्षण विभागाने विविध अभियान राबवले आहेत.. मात्र त्यानंतरही शिक्षण विभाग पटसंख्या वाढवण्यात फेल ठरलाय. त्यामुळेच बुलढाणा जिल्ह्यात 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधील 35 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय... त्यामुळे आता शिक्षण विभाग बुलढाण्याप्रमाणेच पटसंख्या वाढवण्यात अपयशी ठरलेल्या राज्यातील इतर जिल्ह्यातील शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करुन राज्यभर बुलढाणा पॅटर्न राबवणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.