7th Pay Commission saam tv
महाराष्ट्र

7th Pay Commission: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! सातव्या वेतन आयोगानुसार मिळणार पगारवाढ

7th Pay Commission: केंद्राच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आता सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन मिळणार आहे.

Chandrakant Jagtap

7th Pay Commission: तुम्ही जर राज्य सरकारी कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे. राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या धर्तीवर आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देखील सातव्या वेतन आयोगानुसार पगारवाढ मिळणार आहे.

केंद्राच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्यातील कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी दुर करण्यात आल्या असून आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आता सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन मिळणार आहे.

राज्य सरकारने यासंदर्भात शासन निर्णय जारी केला आहे. यामध्ये केंद्र सरकारच्या धरतीवर राज्य सरकारच्या सेवेतील १०४ संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता नव्या या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन मिळणार आहे. दरम्यान महासंघाने परिपत्रक काढून आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. (Latest Marathi News)

राज्य सरकारने वेतन श्रेणीतील तफावतीसंदर्भात एक समिती नेमली होती. या समितीने केलेल्या शिफारशी वित्त आयोगाने स्विकारल्या आहे. त्यामुळे आता १०४ संवर्गातील कर्मचाऱ्यांना पगार वाढीचा लाभ मिळणार आहे. (seventh pay Commission)

दरम्यान केंद्र सरकारने २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू केला आहे. त्यानंतर राज्यात देखील हा आयोग लागू करण्यात येणार होता. मात्र त्यात काही त्रुटी होत्या. आता नव्या शासन निर्णयात या सर्व त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Savalyachi Janu Savli: ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत मोठा ट्विस्ट; सावलीच्या आवाजाचं सत्य उलगडणार, नेमकं काय घडणार?

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतर्फे तीन कुटुंबाला 15 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली

बांग्लादेशात पुन्हा एकदा हिंदू तरूण लक्ष्य, हिंदू तरूणाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

इराणमध्ये खोमेनींची सत्ता धोक्यात, देशातील जनता का उतरली रस्त्यावर

Parbhani : आई, मावशीसह काकाचा ३ वर्षांपूर्वी जीव घेतला, आता आरोपीनं तुरुंगातील टॉयलेटमध्ये स्वतःलाच संपवलं

SCROLL FOR NEXT