72 villages demands water from ujani dam saam tv
महाराष्ट्र

Ujani Dam Water: उजनीच्या पाण्यासाठी अक्कलकोटसह दक्षिण सोलापूरातील शेतकऱ्यांचे बेमुदत उपाेषणास प्रारंभ

शेतीला पाणी नसल्याने शेतक-यांनी उपसले आंदोलनाचे हत्यार.

विश्वभूषण लिमये

Solapur News :

उजनी धरणातून (ujani dam) अक्कलकोट (akkalkot) विधानसभा मतदारसंघातील गावांना हक्काचे पाणी मिळावे यासाठी शेकडो शेतकऱ्यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत पाणी मिळणार नाही तोपर्यंत संघर्ष सुरुच राहणार असा इशारा शेतक-यांनी प्रशासनास दिला आहे. (Maharashtra News)

अक्कलकोट तालुक्यातील 51 गाव आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील 21 गावांना उजनी धरणातून हक्काचे तीन टीएमसी पाणी मिळावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी यासाठी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.

एकरूख उपसा सिंचन योजनेअंतर्गत अक्कलकोट तालुक्यातील 51 गावे आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील 21 गावांना उजनी धरणातून पाणी देण्याची ही योजना करण्यात आली. उजनी धरणातून पाणी अक्कलकोटसह दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी आंदोलनाच्या हत्यार उपसले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जोपर्यंत पाणी मिळणार नाही तोपर्यंत आमरण उपोषण मागे घेतले जाणार नाही असा इशारा महेश बिराजदार यांच्यासह आंदोलक शेतक-यांनी राज्य सरकारला दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blood Sugar Test Timing: ब्लड शुगर चेक करण्याची योग्य वेळ कोणती? झोपेतून उठल्यानंतर की नाश्ता केल्यानंतर?

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढणार, सरकारकडून आले स्पष्टीकरण, वाचा नेमकं काय सांगितलं?

Maharashtra Live News Update : मुख्यमंत्र्यांचा 'डॉक्टर ऑफ सायन्स' पदवी देवून होणार सन्मान

T20 Mumbai League: टी-20 मुंबई लीग पुन्हा रंगणार; रोहित शर्माच्या हस्ते ट्रॉफीचं अनावरण, महिला लीगचीही होणार सुरुवात

Zakir Khan : प्रसिद्ध कॉमेडियनची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील 'त्या' VIDEO मुळे चाहते चिंतेत

SCROLL FOR NEXT