Ratnagiri News, Mumbai Goa Highway, hativale toll plaza saam tv
महाराष्ट्र

Mumbai Goa Highway Toll News : कोकणवासियांसाठी Good News राजापुरातील हातिवले टोलमधून सूट जाहीर; जाणून घ्या आकारणी

आजपासून सुरु झाली टाेल आकारणी.

अमोल कलये

Mumbai Goa Highway Hativale Toll Plaza : मुंबई गोवा महामार्गावरील (mumbai goa highway) टोल नाका आजपासून सुरू होत आहे. राजापूर तालुक्यातील हातिवले इथला टोल नाका (hativale toll) आजपासून सुरु करण्यात आला आहे. स्थानिकांना टाेलमधून 70 टक्के सूट देण्यात आली आहे अशी माहिती टाेल प्रशासनाने साम टीव्हीशी बाेलताना नमूद केले. दरम्यान उर्वरित 20 किलाेमीटरच्या अंतराचे काम लवकरच पुर्ण हाेईल सध्या 56 किलाेमीटरची टाेल आकारणी करीत असल्याचे टाेल प्रशासनाने स्पष्ट केले. (Breaking Marathi News)

मुंबई गोवा महामार्गावरील रस्त्याचे काम अपुर्ण राहिले हाेते. त्यामुळे राजापूर तालुक्यातील हातिवले इथला टोल 22 डिसेंबरला स्थानिकांनी विरोध करुन बंद पाडला. यावेळी माजी खासदार निलेश राणे (mp nilesh rane) यांनी देखील जाेपर्यंत रस्ता पूर्ण हाेत नाही ताेपर्यंत टोल वसुली केली जाऊ दिली जाणार नाही अशी ठाेस भूमिका घेतली होती. त्यामुळे तब्बल साडेतीन महिन्यानंतर हातिवलीतील टोल बंद हाेता.

साेमवारी हा टाेल सुरु करणार असल्याचे जाहीर झाले. त्यानूसार आजपासून त्याची अमंलबजावणी केली जात आहे. दरम्यान अद्याप 20 किलाेमीटर अंतराचे काम पुर्ण झाले नसल्याने प्रशासनाने केवळ 56 किलाेमीटर अंतरासाठीची टाेल आकारणी सुरु केली आहे. तरी टाेलला विराेध करु नये असे आवाहन टाेल प्रशासनाकडून केले जात आहे. याबाबत यशवंत मांजरेकर (टोल वसुली, कंत्राटदार) म्हणाले पालकमंत्री उदय सामंत, राणे साहेब यांच्या माध्यमातून टाेलमध्ये स्थानिकांना आणखी सूट मिळेल का यासाठी प्रयत्न करीत आहेत.

गोविंद बेहरवाल (डेप्युटी मँनेजर नँशनल हायवे ,कोल्हापूर) म्हणाले मुंबई गाेवा महार्मागावरचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. अद्याप काही काम बाकी आहे. त्याची टाेल आकारणी केली जात नाहीये.

अशी आहे टाेल आकारणी

one वे जर्नी

कार 90 रुपये

एलसीवी / एलजिवी 140

ट्रक, बस 295

3 एक्सल 325

HCM, EME 465

ओव्हर साईझ एक्सल 565

रिटर्न जर्नी

कार 130 रुपये

एलसीवी / एलजिवी 210

ट्रक, बस 445

3 एक्सल 485

HCM, EME 695

ओव्हर साईझ एक्सल 850

याबराेबर स्थानिकांना एक महिन्यासाठी 330 रुपयांचा पास (आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करुन) दिला जाणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठपणाला

SCROLL FOR NEXT