Nanded Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Shocking : महाराष्ट्र हादरला! ७ वर्षीय चिमुकलीवर शाळेत अत्याचार, नराधम शिक्षकाने केलं हैवानी कृत्य

Nanded Crime News : नांदेडमध्ये ७ वर्षांच्या विद्यार्थिनीवर शिक्षकाने केलेल्या बलात्कारामुळे खळबळ उडाली आहे. आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आली असून पोक्सो व BNS कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर संशय, भीती आणि संतापाची लाट उसळली आहे.

Alisha Khedekar

  • नांदेडमध्ये ७ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार

  • आरोपी चिमुकलीच्या शाळेतील शिक्षक असल्याचे उघड

  • पीडितेच्या आईच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

  • आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

नाशिकच्या मालेगावमधील ३ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करण्यात आले, त्यानंतर त्या मुलीची हत्या देखील करण्यात आली. ही घटना ताजी असतानाच नांदेडमधून शिक्षकीपेशाला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एका हैवान शिक्षकाने तब्बल ७ वर्षाच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केला आहे. धक्कदायक म्हणजे ही मुलगी ज्या शाळेत शिकत होती त्याच शाळेत आरोपी शिक्षक म्हणून काम करत होता. या घटनेनंतर पोलिसांनी नराधम शिक्षकाला बेड्या ठोकल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना ही नांदेड शहरात ( Nanded City ) घडली असून काल म्हणजेच २० नोव्हेंबर रोजी पीडित अल्पवयीन मुलगी शाळेत जाण्यास कुटुंबियांना नकार देत होती. रोज आवडीने शाळेत जाणारी मुलगी आज शाळेत जायला नकार देत असल्याने तिच्या आईने तिला सतत विचारणा केली. तरीही मुलगी गप्प बसल्याने आईने प्रेमाने तिला जवळ घेऊन विचारल्यानंतर शिक्षकाने केलेला प्रकार तिने सांगितला.

घडलेला प्रकार ऐकून पीडित मुलीची आई संतापली. तिने तातडीने पोलीस स्टेशन गाठले. त्या हैवान शिक्षकाविरोधात भाग्यनगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून आरोपी शिक्षक विशाल लोखंडे ( vishal lokhande ) याच्यावर 64(2), 65(2) ,351(2) Bns , 468 पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान आरोपी शिक्षकास अटक करण्यात आली असून हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवण्याची विनंती न्यायालयाला करणार असल्याची प्रतिक्रिया उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैजंने यांनी दिली आहे. शिवाय या घटनेचा तपास सुरु असून विद्येचं मंदिर असलेल्या शाळेतसुद्धा मुली सुरक्षित नाहीत ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vivek Oberoi: 'कोण शाहरुख खान...? त्याला सगळे विसरतील'; किंग खानबद्दल असं का बोलला विवेक ओबेरॉय

Aloo Kachori : आलू कचोरी बनवण्यासाठीच्या या भन्नाट ५ टिप्स, नक्की करा फॉलो

Mumbai Crime: 'ते' फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी, बॉयफ्रेंडच्या त्रासाला कंटाळून १७ वर्षीय मुलीची आत्महत्या

Accident News : ५० मजूरांनी भरलेल्या ट्रकचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, ४० जण गंभीर जखमी

Maharashtra Live News Update : मावळात दोन्हीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित

SCROLL FOR NEXT