65 lakhs rupees loss of msrtc parbhani in two days Saam tv
महाराष्ट्र

Parbhani : परभणीत आजपासून बससेवा सुरळीत, दाेन दिवसांत एसटी महामंडळाचे 65 लाखांचे नुकसान

MSRTC Bus Service : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी जिल्ह्यात चार दिवसांपासून मराठा समाजाकडून आंदोलन करण्यात येत आहे.

राजेश काटकर

Parbhani News :

मराठा आरक्षणाच्या (maratha reservation) मागणीसाठी आणि मराठा आंदाेलक मनोज जरांगे- पाटील (manoj jarange patil) यांच्या समर्थनार्थ परभणी जिल्ह्यात दाेन दिवस (शनिवार आणि रविवार) ठिकठिकाणी मराठा समाजाने रास्ता रोको, चक्काजाम आंदोलन केले. यामुळे बहुतांश भागातील एसटीची वाहतूक खाेळंबली. काही भागातील फे-या रद्द झाल्या. दरम्यान गेल्या दाेन दिवसांत राज्य परिवहन महामंडळाचे 65 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. (Maharashtra News)

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून मराठा समाजाचे विविध प्रकारचे आंदोलने सुरू आहेत. या दरम्यान, हिंगोली व परभणी जिल्ह्यात सलग दोन दिवस दोन बस पेटवून देण्यात आल्या.

दरम्यान शनिवारी व रविवारी या दाेन दिवसांत 4 हजार 800 बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या. यामुळे महामंडळाला 65 लाख रुपयांचा फटका बसला. परिणामी, प्रवाशांची गैरसोय तर झालीच त्याचबरोबर एसटी महामंडळ प्रशासनालाही मोठा फटका बसला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

1 Gram Gold Earrings : 1 ग्रॅम गोल्डमध्ये बनवा सोन्याचे कानातले, महिलांसाठी सुंदर ७ डिझाईन्स

Maharashtra News Live Update: पुण्यात दोन ऑक्टोबर रोजी होणारे स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचे आंदोलन स्थगित

मोठी बातमी! जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या आधी साताऱ्यात ठाकरे गटाला धक्का; बड्या नेत्याचा शिंदे गटात प्रवेश

सुकन्या समृद्धी योजना, PPF मध्ये गुंतवणूक करताय? सरकारने जाहीर केले नवे व्याजदर, फायदा की झटका?

Sambhajinagar : मराठवाड्याचं 'महाबळेश्वर'! निसर्ग सौंदर्याने नटलंय 'हे' थंड हवेचं ठिकाण

SCROLL FOR NEXT