Nashik Accident  Saam tv
महाराष्ट्र

Nashik Accident News: घरासमोर खेळताना भरधाव दुचाकीची जोरदार धडक, 6 वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

Nashik Bike Accident: या अपघाताचा तपास नाशिक पोलिसांकडून (Nashik Police) सुरु आहे.

Priya More

Nashik News: नाशिकमध्ये (Nashik) भरधाव दुचाकीच्या धडकेमध्ये (Bike Accident) चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकच्या ओंकारनगर परिसरात ही घटना घडली आहे. या अपघातामध्ये सहा वर्षांच्या अर्णवचा मृत्यू झाला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघाताचा तपास नाशिक पोलिसांकडून (Nashik Police) सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक येथील म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या ओंकारनगर परिसरात ही घटना घडली. बेजबाबदार दुचाकीस्वाराने सहा वर्षांच्या मुलाला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये अर्णव रोशन भाबड गंभीर जखमी झाला. जखमी झालेल्या अर्णवचा रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघाताची ही घटना शनिवारी सकाळी घडली.

रोशन भाबड हे नोकरीनिमित्त नाशिकच्या ओमकारनगर कॉलनी रोडवरील सुप्रभा बंगलो क्रमांक 77 मध्ये आपल्या कुटुंबासोबत राहत होते. शनिवारी रोशन यांचा मुलगा अर्णव आपल्या घरासमोर मित्रांसोबत खेळत होता. अर्णव घरासमोरील रस्त्या ओलांडायला गेला. त्याचवेळी बिरसा मुंडा हॉस्पिटलकडून भरधाव येणाऱ्या दुचाकीने अर्णवला जोरदार धडक दिली. दुचाकी भरधाव असल्यामुळे चालकाला त्यावर नियंत्रण मिळवता न आल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.

या अपघातामध्ये अर्णवच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याचसोबत त्याच्या हातापायाला देखील मार लागला होता. अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या अर्णवला त्याच्या कुटुंबीयांनी तात्काळ नजीकच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. पण उपचारादरम्यान अर्णवचा मृत्यू झाला. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याप्रकरणी दुचाकीस्वाराविरोधात कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी मृत अर्णवच्या नातेवाईकांनी केली आहे. जोपर्यंत संबंधित दुचाकीस्वाराविरोधात कारवाई होत नाही तोपर्यंत चिमुकल्याचा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा संतप्त नातेवाईकांनी घेतला. अर्णवच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. याप्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. पोलीस आरोपी दुचाकीस्वाराचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धमकीनंतरही बिग बींचा रविवारचा नियम कायम; चाहत्यांना भेटण्यासाठी शोधली भन्नाट शक्कल

Vastu Tips For Wall Clock: घरात घड्याळ कुठे लावावे? वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशा कोणती?

Stylish Tops For Women: जीन्सवर कोणत्या प्रकारचे टॉप्स घालावेत? पाहा लेटेस्ट कलेक्शन

Jalgaon Firing: दुचाकीवरून आलेल्या तीन हल्लेखोरांकडून 25 वर्षीय तरुणावर बेछुट गोळीबार, भुसावळ हादरलं!

Co-Ords Sets Dress For Women: दिवाळीनिमित्त महिलांसाठी को-ऑर्ड सेट ड्रेसचे लेटेस्ट 5 पॅटर्न्स

SCROLL FOR NEXT