Sangli, Sangli Crime News, Youth, tasgoan Saam tv
महाराष्ट्र

Sangli Crime: मनपात नोकरीचे आमिष दाखवून दोघांना सहा लाखांचा गंडा; गुन्हा दाखल

दोघांवर विटा पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विजय पाटील

सांगली - मुंबई महानगर पालिकेत नोकरीला लावतो असे सांगत सांगलीच्या (Sangli) विट्यातील दोघांना सहा लाख रुपयांना गंडा घातल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी रमेश भिमराव कांबळे राहणार फुलेनगर विटा, मुळ गाव मुंबई आणि कुणाल राजाराम जाधव राहणार डोंबिवली,पश्चिम मुंबई या दोघांवर विटा पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संबंधित फसवणूक झालेल्या मुलाचे वडील किरण भिंगारदेवे यांनी फिर्याद दिली आहे.

हे देखिल पाहा -

विटा येथील भाजीपाला व्यवसायिक किरण भिंगारदेवे यांचा मुलगा सचिन आणि सूरज भस्मे यांना मुंबई महानगरपालिकेमध्ये लिपिक पदावर नोकरी लावतो म्हणून रमेश कांबळे याने २२ मार्च २०१७ रोजी ते यावर्षीच्या जून महिन्यापर्यंत आरटीजीएस, रोख तसेच चलनाने कुणाल जाधव याच्या नावावर नोटरी करून प्रत्येकी तीन लाख रुपये प्रमाणे एकूण ६ लाख रुपये घेतले.

शिवाय रमेश कांबळे आणि कुणाल जाधव यांनी मुंबई महानगरपालिकेत लिपीक पदावरती हजर राहणेबाबतचे पत्र या दोघांना दिले. मात्र ही दोन्ही पत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाल्याने अखेरीस किरण भिंगारदेवे यांनी रमेश कांबळे आणि कुणाल जाधव यांनी मुंबई महानगरपालिकेचे नोकरीची बनावट सही आणि शिक्याचे पत्रे देवून फसवणूक केली असल्याबाबत शनिवारी विटा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

... तर दोन मंत्री राजीनामा देतील, मित्रपक्षाचा मुख्यमंत्र्यांना इशारा; राजकारणात खळबळ

Maharashtra News Live Update: श्रावणातील तिसऱ्या सोमवारी भिमाशंकरमध्ये भाविकांची गर्दी

Tuesday Horoscope : उद्या नशीब देणार साथ की अडचणी वाढणार? वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Fruit Benefits : तुमच्या रक्तातील पेशी कमी होतायत? 'ही' ६ फळे दररोज खा; २ दिवसांत दिसेल रिझल्ट

Anjeer Benefits: ड्रायफ्रूट्स खायला आवडतं? मग रोज दिवसाला २ अंजीर खा होतील हे ७ आरोग्यदायी फायदे

SCROLL FOR NEXT