विठ्ठल रुक्मिणी मंदिर सुधारणेसाठी 55 कोटींचा खर्च SaamTv
महाराष्ट्र

विठ्ठल रुक्मिणी मंदिर सुधारणेसाठी 55 कोटींचा खर्च

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे पुरातन रूप जतन करण्यासाठी पुरातत्व विभागाच्या वतीने डीपीआर ला अंतिम रूप मिळणार असून याचा खर्च ५५ कोटी रुपयांपर्यंत जाणार आहे.

भारत नागणे

पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे पुरातन रूप जतन करण्यासाठी पुरातत्व विभागाच्या वतीने डीपीआर ला अंतिम रूप मिळणार असून याचा खर्च ५५ कोटी रुपयांपर्यंत जाणार आहे. आता राज्य शासनाने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. आषाढी एकादशीला शासकीय महापूजेसाठी येणारे मुख्यमंत्री याबाबत काही घोषणा करणार का ? या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 55 crore for renovation of Vitthal Rukmini temple

हे देखील पहा -

विठ्ठल रुक्मिणी मंदिर मजबुतीकरणास साधारण साडे आठ कोटी रुपये एवढा खर्च होणार आहे. मंदिराच्या स्ट्रक्चरल मजबुतीकरणाला साडेचौदा कोटी खर्च होणार आहे. विद्युतीकरण, अग्निशमन यंत्रणा, सीसीटीव्ही यासाठी साडे सहा कोटी खर्च अपेक्षित आहे.

याशिवाय नव्याने उभ्या कराव्या लागणाऱ्या वास्तूसाठी साडे अकरा कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. एकंदर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करताना मंदिराची आर्थिक परिस्थिती पाहून प्राधान्यक्रम ठरवून ही कामे हाती घेतली जाणार आहेत. हा सर्व खर्च 55 कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकतो. अशातच गेल्या दीड वर्षांपासून कोरोना काळामध्ये मंदिराला 32 कोटी रुपयांचा तोटा सोसावा लागला आहे. या कामासाठी शासनाकडूनही आर्थिक मदतीची गरज आहे.

श्री विठ्ठल-रुक्मिणी शासकीय महापूजा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येणार आहेत. त्यावेळी यासाठी ते मदतीची घोषणा करतील का? याकडे सर्वांचे लक्ष आहे. आज विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आज मंदिराची कोणती कामे होणार आहेत, याची पाहणी केली आहे. त्यांनी पंढरपूर मधील प्रशासनाची, पुरातत्व विभागाच्या आणि मंदिर समिती अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन सूचना दिल्या आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bogus Doctor : बोगस डॉक्टरांचे पितळ उघडे; पदवी नसताना रुग्ण तपासणी, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र-तेलंगनाचा संपर्क तुटला; सीमेवरील पोडसा पूल पाण्याखाली

Government Apps: आता मोबाईलवर मिळणार सरकारी सेवा; फक्त एका क्लिकमध्ये, वाचा सविस्तर

Accident : भयंकर अपघात! दोन कारची समोरासमोर धडक, होरपळून ८ जणांचा जागीच मृत्यू

Ladki Bahin Yojana: १२ हजार पुरुषांनी लाटले लाडकीचे पैसे, सरकारला लावला १६२ कोटींचा चुना, RTI मधून धक्कायदाक माहिती समोर

SCROLL FOR NEXT