एकाच व्यक्तीच्या दोन RTPCR चाचण्या एक पॉझिटिव्ह दुसरी निगेटिव्ह !

जयस्वाल यांनी सांगितले की, RTPCR टेस्ट दोन वेळा केल्यानंतर भिन्न अहवाल आल्याने त्यांचे मानसिक स्वास्थ खराब झाले. याचा त्यांच्या कुटुंबावर विपरीत परिणाम झाला.
एकाच व्यक्तीच्या दोन RTPCR चाचण्या एक पॉझिटिव्ह दुसरी निगेटिव्ह !
एकाच व्यक्तीच्या दोन RTPCR चाचण्या एक पॉझिटिव्ह दुसरी निगेटिव्ह !SaamTv

वसई-विरार : वसई-विरार शहरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव ओसरताना दिसत असला तरी, शहरात अजूनही काही प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. लक्षण आढळणाऱ्या रुग्णांची तपासणी करताना त्यांना कोरोना चाचणी करण्यास सांगितले जाते पण या चाचणी प्रक्रियेत अनेक त्रुटी असल्याचे आढळून आले आहे. Two RTPCR tests of same person, one positive, one negative!

हे देखील पहा -

नायगाव मध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीच्या बाबतीत एक विचित्र प्रकार समोर आला आहे. सदर व्यक्तीने दोन ठिकाणी कोरोना चाचणी केली. मात्र त्याचे दोन्ही कोरोना अहवाल भिन्न आले. यामुळे कोरोना प्रादुर्भाव जरी कमी होत असला तरी अशा चुकीच्या अहवालामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

नायगाव पूर्व परिसरात राहणारे रिक्षाचालक विनोद जयस्वाल (४०) यांना मागील काही दिवसांपासून कोरोनाची लक्षणे जाणवू लागली. त्यांनी सुरवातीला कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापालिका रुग्णालयात ८ जुलै रोजी कोरोना चाचणी केली. त्यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. यावेळी त्यांना डॉक्टरांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होण्यासाठी सांगितले.

एकाच व्यक्तीच्या दोन RTPCR चाचण्या एक पॉझिटिव्ह दुसरी निगेटिव्ह !
MPSC मार्फत १५ हजार ५११ पदांची भरती प्रक्रिया लवकरच - दत्तात्रय भरणे

पण जयस्वाल यांना सौम्य लक्षण असल्याने तसेच त्यांची मुळव्याधीची शत्रक्रिया झाल्याने त्यांना घरीच राहून उपचार करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. दरम्यान त्यांनी आपल्या खासगी डॉक्टरांना याची माहिती दिली. डॉक्टरांनी त्यांना दुसरीकडे सुद्धा चाचणी करण्याचा सल्ला दिला. म्हणून जयस्वाल यांनी नायगाव येथील एस एल आर खासगी चाचणी केंद्रात १२ जुलै रोजी चाचणी केली.

यावेळी मात्र त्यांची चाचणी निगेटिव्ह आली. जयस्वाल यांनी सांगितले की, RTPCR टेस्ट दोन वेळा केल्यानंतर भिन्न अहवाल आल्याने त्यांचे मानसिक स्वास्थ खराब झाले. याचा त्यांच्या कुटुंबावर विपरीत परिणाम झाला. जर अशा पद्धतीने नागरिकांच्या जीवाशी खेळ केला जाणार असेल तर नागरिकांनी कसे जगायचे असा सवाल जयस्वाल यांनी उपस्थित केला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com