MPSC मार्फत १५ हजार ५११ पदांची भरती प्रक्रिया लवकरच - दत्तात्रय भरणे

गट अ ते क पर्यंतच्या एकूण १५ हजार ५११ पदांसाठीची भरती प्रक्रिया लवकरच MPSC मार्फत पार पाडण्यात येणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभाग राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.
MPSC मार्फत १५ हजार ५११ पदांची भरती प्रक्रिया लवकरच - दत्तात्रय भरणे
MPSC मार्फत १५ हजार ५११ पदांची भरती प्रक्रिया लवकरच - दत्तात्रय भरणेSaamTv

मुंबई : वैद्यकीय शिक्षण विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग आदी विभागांना पद भरती निर्बंधामधून सूट देण्यात आली आहे. गट अ ते क पर्यंतच्या एकूण १५ हजार ५११ पदांसाठीची भरती प्रक्रिया लवकरच MPSC मार्फत पार पाडण्यात येणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभाग राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. Recruitment process for 15 thousand 511 posts through MPSC soon - Dattatraya Bharne

राज्यमंत्री भरणे यांनी सांगितले, MPSC च्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या परीक्षा आणि रिक्‍त पदांच्या भरती संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली आहे. या बैठकीत काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असून सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग इत्यादी विभागांना पदभरतीच्या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे.

गट अ मधील एकूण ४ हजार ४१७ पदे, गट ब मधील ८ हजार ३१ पदे आणि गट क मधील ३ हजार ३६ पदे अश्या एकूण १५ हजार ५११ पदांच्या भरतीस राज्य शासनाच्या वित्त विभागाने २०१८ सालापासून मान्यता दिलेली आहे. या पदभरतीच्या अनुषंगाने या संबंधित पदांचे आरक्षण तपासून जलदरित्या हि भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

याशिवाय केरळ लोकसेवा आयोगाच्या (Kerala PSC) धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्य संख्येत वाढ करण्यासाठी देखील या बैठकीत महत्वपूर्ण चर्चा करण्यात आली असून भविष्यात पात्र विद्यार्थ्यांच्या मुलाखती जलद गतीने पार पाडता येतील असेही दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

MPSC मार्फत १५ हजार ५११ पदांची भरती प्रक्रिया लवकरच - दत्तात्रय भरणे
अकोल्यात MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन

उमेदवारांच्या मुलाखतीच्या टप्प्यावर प्रलंबित असलेली भरती प्रक्रिया जलद गतीने पार पाडण्यासाठी MPSC सदस्यांची ४ रिक्त पदे भरणे गरजेचे असून सदस्यांची ही पदे भरण्यासाठी जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत हि प्रक्रिया पार पाडण्याबाबतही बैठकीत निर्देश देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

संघ लोकसेवा आयोग UPSC मार्फत ज्याप्रमाणे पुढील संपूर्ण वर्षात होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक दरवर्षी जाहीर केले जाते. त्याच अनुषंगाने MPSC च्या परीक्षांचेही वेळापत्रक जाहीर करण्याबाबतचे निर्देशही देण्यात आले असल्याची माहिती राज्यमंत्री भरणे यांनी दिली.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com