Solapur News
Solapur News Saam TV
महाराष्ट्र

Solapur News: थकबाकीदारांमध्ये सोलापूर आघाडीवर; ५ हजार कोटींचे वीजबिल थकीत

Ruchika Jadhav

विश्वभूषण लिमये

Solapur : डिसेंबर,२०२२ अखेर महावितरण पुणे प्रादेशिक विभागातील १२ लाख ५४ हजार कृषिपंप वीज ग्राहकांची थकबाकी १२ हजार ६१ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. त्यात सर्वाधिक थकबाकीदार कृषिपंप ग्राहक सोलापूर मंडळातील असून, याची संख्या 3 लाख ६८ हजार असून, थकीत आणि चालू बिलाची एकूण थकबाकी ५ हजार ३३८ कोटी रुपयांपर्यंत पोहचली आहे. (Latest Solapur News)

नवीन कृषिपंप धोरण २०२० शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य शासनाने तयार केले आहे. ३१ मार्च,२०२३ पर्यंत थकबाकी भरणाऱ्या ग्राहकांना थकबाकीवर ३० टक्के सूट देण्यात येणार आहे. तसेच विलंब आकार आणि व्याज पूर्णतः माफ करण्यात येत आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी या योजनेचा जास्तीतजास्त लाभ घ्यावा, असे पुणे प्रादेशिक विभागाचे संचालक अंकुश नाळे यांनी म्हटले आहे.

राज्यात कृषिपंपासाठी सगळ्यात जास्त विजेचा वापर पुणे प्रादेशिक विभागातील पुणे, सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यात होत आहे. महागडी चारचाकी वाहन वापरणारे, बंगल्यात राहणारे आणि नियमित आयकर भरणारे शेतकरी आहेत. त्यामुळे कृषिपंपांकडे थकीत बिले भरल्यास वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यास मदत होणार आहे.

या पाचही जिल्ह्यात कृषिपंपासाठी विजेचा मोठ्या प्रमाणात वापर होत असून ऊस,फळबागा,भाजीपाला आणि फुलशेती यासाठी विजेचा वापर करणाऱ्या सधन शेतकऱ्यांची ही संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे वीजबिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Murbad Railway Line: कल्याण मुरबाड रेल्वेच्या भूसंपादनाला शेतक-यांचा विरोध, पाेलिसांच्या मध्यस्थीनंतर आंदाेलन शमले

Herbal Tea पिणं आरोग्यासाठी लाभदायी

Accident News: भरधाव पिकअप अनियंत्रित होऊन टेम्पोला धडकला; भीषण अपघातात ९ जणांचा जागीच मृत्यू, थरारक VIDEO

Tulsi Vastu Tips: सकाळी तुळशीला पाणी घालण्याची योग्य वेळ काय?

Today's Marathi News Live : महाविकास आघाडीची उद्या सेनाभवनमध्ये संविधान वाचवा सभा

SCROLL FOR NEXT