Shri Swami Samarth Gurupeeth Saam TV
महाराष्ट्र

Nashik: श्री स्वामी समर्थ गुरुपीठात 50 कोटींचा अपहार?, पोलिसात तक्रार दाखल

अण्णासाहेब मोरे यांच्यावर फौजदारी कारवाई मागणी तक्रारदार अमर पाटील यांनी केली आहे.

अभिजीत सोनावणे

नाशिक: नाशिकच्या (Nashik) त्र्यंबकेश्वर येथील श्री स्वामी समर्थ (Shri swami samarth) गुरुपीठात ५० कोटींचा अपहार झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. गुरुपीठाचे अण्णासाहेब मोरे यांच्याविरोधात पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आली आहे. २००९ ते २०२१ या काळात त्र्यंबकेश्वरच्या श्री स्वामी समर्थ गुरुपीठ या धर्मादाय संस्थेचा दुरुपयोग करून ५० कोटींचा अपहार केल्याची तक्रार पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे. धुळ्याच्या स्वामी समर्थ केंद्राचे सेवेकरी अमर पाटील यांनी तक्रार केली आहे. अण्णासाहेब मोरे यांच्यावर फौजदारी कारवाई मागणी तक्रारदार अमर पाटील यांनी केली आहे.

अण्णासाहेब मोरे यांचा संपूर्ण महाराष्ट्रात मोठा शिष्य वर्ग आहे. मोरे यांच्या विरोधात अपहाराची तक्रार देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. तर अपहाराची तक्रार प्राप्त झाली असून धर्मादाय आयुक्तांकडून यासंदर्भातला अहवाल आल्यानंतर त्यातील तथ्य तपासून पुढील कारवाई करू असे पोलीस अधीक्षक सचिन पाटील म्हणाले आहेत. तक्रारदारांनी आर्थिक स्वार्थापोटी खोटे आरोप केल्याचा दावा स्वामी समर्थ गुरुपीठच्या चंद्रकांत मोरेंनी केला आहे. श्री स्वामी समर्थ गुरुपीठ केंद्रानेल हे सर्व आरोप फेटाळले आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी विरोधकांवर टीका करू नका, भाजपच्या वरिष्ठांकडून उमेदवारांना कानमंत्र

Maharashtra Live News Update : पुण्यात मतदान पेट्या ने-आण करण्यासाठी PMPML च्या १०५६ बसेस धावणार

गद्दार...महिलांनी हातात चपला घेतल्या; उपनगराध्यक्षपदावरून अंबरनाथमध्ये राडा, VIDEO

Beetroot Raita Recipe : पौष्टिक आणि चविष्ट बीटरुट रायता कसा बनवावा? लगेचच नोट करा रेसिपी

भरसभेत कार्यकर्ता I Love You म्हणाला, अजित पवार म्हणाले घरी जाऊन बायकोला...

SCROLL FOR NEXT