Satara Saam
महाराष्ट्र

Satara News: बेपत्ता चिमुकलीचा शेतातच मृतदेह सापडला, अपघात की घातपात? ५ वर्षीय मुलीसोबत नेमकं काय घडलं?

Missing 5-Year-Old Girl Found Dead in Satara Village Field: सायंकाळी बेपत्ता झालेल्या ५ वर्षीय चिमुकलीचा मृतदेह आज पहाटे गावातीलच एका शेतात आढळून आल्याने संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे.

Bhagyashree Kamble

संभाजी थोरात, साम टीव्ही

सातारमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. वाठार गावातील एका ५ वर्षीय चिमुकलीचा मृतदेह शेतात आढळून आला आहे. चिमुकली सायंकाळी बेपत्ता झाली होती. पोलिसांनी शोधाशोध केली. आज तिचा मृतदेह शेतात आढळून आला आहे. चिमुकलीचा मृतदेह शेतात आढळून आल्याने गावात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिसांच्या पथकाकडून सुरू आहे.

संस्कृती रामचंद्र जाधव असे चिमुकलीचे नाव आहे. ही ५ वर्षीय मुलगी गुरूवारी सायंकाळी बेपत्ता झाली होती. नातेवाइकांनी चिमुकलीचा शोध घेतला, पण ती काही सापडली नाही. नंतर कुटुंबाने कराड तालुका पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली.

चिमुकलीचा शोध घेण्यासाठी अतिरिक्त पोलीस अधिक्षक वैशाली कडू - कर, पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर, तसेच पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाची नेमणुक करण्यात आली. ड्रोन,श्वान पथक आणि इतर साधनांच्या सहाय्याने रात्रभर शोधकार्य सुरू होते.

अखेर मध्यरात्री संस्कृतीचा मृतदेह गावातीलच एका शेतात आढळून आला. या मृत्यूबाबत घातपाताची शक्यता वर्तवली जात आहे. चिमुकलीचा मृत्यू नेमका कसा झाला? याचा शोध घेण्यासाठी विशेष पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. ही घटना नेमकी कशामुळे घडली? अपघात, घातपात की इतर काही, याचा तपास लवकरच पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT