आईपासून दूर गेलेल्या मांजराच्या 5 पिल्लांची अवघ्या 8 तासात घडवली भेट संदीप नागरे
महाराष्ट्र

आईपासून दूर गेलेल्या मांजराच्या 5 पिल्लांची अवघ्या 8 तासात घडवली भेट

माणसाच व प्राण्यांचे त्यांच्या चिमुकल्यावर सारखच प्रेम असत. हे आपण अनेकदा पाहिलं आणि ऐकल ही असेल पोटच्या गोळ्याला जरा ही इजा झाली तर मनाला वेदना आणि दुःख होतच, अशीच काहीशी घटना आज हिंगोलीत घडली.

संदीप नागरे

संदीप नागरे

हिंगोली : माणसाच व प्राण्यांचे त्यांच्या चिमुकल्यावर सारखच प्रेम असत. हे आपण अनेकदा पाहिलं आणि ऐकल ही असेल पोटच्या गोळ्याला जरा ही इजा झाली तर मनाला वेदना आणि दुःख होतच, अशीच काहीशी घटना आज हिंगोलीत घडली.

हे देखील पहा-

त्याच झाल अस की, हिंगोली तालुक्यातील बासंबा शिवारात एका शेतात, ट्रॅक्टर ला जोडणी केलेल्या मळणी यंत्रात प्राण्यांमध्ये अतिशय दुर्मिळ होत चाललेल्या, उद मांजरीने गोंडस अशी पाच पिल्ले जन्माला घातली. पावसाळ्याच्या दिवसात आपल्या पिलांसाठी सगळ्यात सुरक्षित जागा म्हणून तीने या मळणी यंत्राची बहुदा निवड केलेली असावी. मात्र हीच सुरक्षित जागा तिच्या पिलांना एक दिवस तिच्या पासून कोसो दूर घेऊन जाईल याची किंचितही कल्पना तिला नसावी. मात्र हे सगळं आज घडलं आणि आई पासून ही पिल्ल कोसो दूर गेली.

सद्या खरीपाची पिके लवकरच काढणीला येणार आहेत, या साठी प्रत्येक शेतकरी आपली मळणी यंत्र पिकांची काढणी करण्यासाठी सज्ज करत आहेत, हिंगोली तालुक्यातील बासंबा शिवारातील शेतकरी पंडित थोरात यांनी देखील गेल्या वर्ष भरापासून शेतात अडगळीच्या ठिकाणी लावून ठेवलेल्या पेरणी यंत्राला आज ट्रॅक्टर लावून गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आणले, मात्र या मळणी यंत्राचे काम सुरू असतानाच काम करणारे कारागीर अचानक थांबले कारण त्यांना मळणी यंत्रात कोणत्या तरी प्राण्यांचे पिल्ले असल्याचे लक्षात आले.

याची माहिती तात्काळ प्राणीमित्र अमोलकुमार घांगडे यांना देण्यात आली. मात्र ही पिल्ल मळणी यंत्रात अडकल्याने त्यांना काढणे अशक्य होते, अखेर त्यांनी हिंगोली शहरातील सर्पमित्र व प्राणीमित्र म्हणून ओळख असलेल्या मुरलीधर कल्याणकर यांना बोलावून घेतले. कल्याणकर यांनी मळणी यंत्रात किंचाळत असलेल्या पिल्लांना अलगद बाहेर काढून पाहिले असता, ही पिल्ल प्राण्यांमधल्या अतिशय दुर्मिळ असणाऱ्या उद्य मांजराची असल्याचे निष्पन्न झाले.

कल्याणकर यांनी या पिल्लांना दूध व मांसाहार खाऊ घातले, मात्र ही पिल्ल केवळ पंधरा ते वीस दिवसांची असल्याने त्यांना सोडायचे कुठे असा प्रश्न पडला. अन् सुरू झाला त्यांच्या आईचा शोध, कल्याणकर यांनी या बाबत वन विभागाला माहिती देऊन, पिल्लांच्या आईचा शोध घेण्याचे ठरविले, ज्या बासंबा शिवारातील शेतकऱ्याच्या शेतात ही पिल्ल आढळली तिथेच त्यांना सोडून त्यांच्या आईची भेट घडवायचे निश्चित झाले. आणि अखेर आठ तासांच्या प्रयत्नानंतर या पिल्लांना आईचा संचार असलेल्या ठिकाणी सोडण्यात आले. काहीवेळातच पिल्लांच्या किंचाळण्याचा आवाज ऐकताच आईने पिल्लांकडे धूम ठोकत त्यांना आपल्या कुशीत घेतले. काळजाचा तुकडा असलेली पिल्लं दुरावल्याने सैरभैर झालेली आई, आपल्या पाचही पिल्लांची भेट झाल्याने शांत झाली होती, हा सगळा प्रसंग पाहून उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

SCROLL FOR NEXT