IMAGICA WATER PARK TRAGEDY: 47-YEAR-OLD TOURIST DIES AFTER SUSPECTED HEART ATTACK IN RAIGAD Saam Tv
महाराष्ट्र

Shocking : धक्कादायक! वॉटर पार्कमध्ये ४७ वर्षीय पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Khalapur Imagica Water Park News : रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील इमॅजिका वॉटर पार्कमध्ये फिरण्यासाठी आलेल्या ४७ वर्षीय पर्यटकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे मृत्यू झाल्याचं समोर आले आहे.

Alisha Khedekar

  • खालापूर येथील इमॅजिका वॉटर पार्कमध्ये ४७ वर्षीय कपिल पाटील यांचा अचानक मृत्यू

  • हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे मृत्यू

  • या घटनेमुळे पाटील कुटुंबीयांमध्ये शोककळा

विकास मिरगणे, नवी मुंबई

रायगड जिल्ह्यातील खालापूर परिसरातील प्रसिद्ध इमॅजिका वॉटर पार्कमध्ये फिरण्यासाठी आलेल्या ४७ वर्षीय पर्यटकाचा अचानक मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे पार्क परिसरात काही काळ हळहळ व्यक्त करण्यात आली असून पर्यटकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, कपिल शांताराम पाटील हे आपल्या कुटुंबीयांसह आणि मित्रपरिवारासोबत पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी इमॅजिका वॉटर पार्कमध्ये आले होते. दिवसभर वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करताना अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्यांना चक्कर आली आणि ते पार्क परिसरातच कोसळले. घटना घडताच पार्क कर्मचाऱ्यांनी तत्काळ धाव घेतली.

कपिल पाटील यांना तातडीने वैद्यकीय मदत देण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच त्यांना जवळच्या रुग्णालयात हलवण्याची तयारी करण्यात आली. मात्र वैद्यकीय तपासणीनंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह पुढील तपासणी आणि शवविच्छेदनासाठी खालापूर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

प्राथमिक वैद्यकीय माहितीनुसार कपिल पाटील यांचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे पाटील कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नातेवाईक आणि मित्रपरिवाराकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live: सिरोंचा तालुक्यातील मुत्तापूर पुलिया पाण्याखाली; सहा गावे संपर्काबाहेर, गर्भवतीला बैलबंडीने नेण्याची वेळ

CM टार्गेट, हनीट्रॅपमध्ये मंत्र्यांचा पोरगा,जंतर-मंतर आंदोलन; STF नं 'उधळला जैश-ए-मोहम्मदचा मोठा कट

How To Make Puffed Poori: हॉटेलसारख्या फुगलेल्या आणि मऊ पुरी बनवायच्या? फॉलो करा 'या' ७ सोप्या टिप्स

Maharashtra Rain Alert : पुढील ५ दिवस महत्वाचे, विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळणार; अनेक जिल्ह्यांना अलर्ट

हॉटेलच्या रुममध्ये पांढऱ्या बेडशीटच का असतात, काळ्या रंगाच्या का नाही? कारण काय?

SCROLL FOR NEXT