432 voters cast their vote in home dhule lok sabha election news  Saam Digital
महाराष्ट्र

Dhule Constituency : धुळे लोकसभा मतदारसंघात गृह मतदानासाठी उदंड प्रतिसाद, 432 मतदारांनी बजावला हक्क

धुळे शहरातील मिल परिसरात टपाली मतदान प्रक्रिया राबविण्यात आली आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणी अश्याच प्रकारे ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग बांधवांसाठी टपाली मतदान प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

भूषण अहिरे

धुळे लोकसभा मतदारसंघात येत्या 20 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या निवडणूकीत 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरीक, दिव्यांग मतदार व कोविड-19 रुग्ण मतदार यांना टपाली मतदान पथकांच्यामार्फत टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे, त्यानुसार धुळे लोकसभा मतदारसंघात 432 मतदारांनी घरुन मतदानाचा हक्क बजावला. (Maharashtra News)

धुळे शहरातील मिल परिसरात टपाली मतदान प्रक्रिया राबविण्यात आली आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणी अश्याच प्रकारे ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग बांधवांसाठी टपाली मतदान प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

धुळे लोकसभामतदार संघात 360 मतदार 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरीक तर 72 दिव्यांग मतदार आहेत. या सर्वांनी घरुनच मतदानाचा हक्क बजावला आहेत. याकरीता संपूर्ण मतदारसंघात 38 टीमची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक टीममध्ये तीन ते चार जणांचा समावेश असून ही टीम या मतदारांच्या घरी जाऊन त्यांचे मतदान नोंदवून घेत आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

80s Retro Trend: मराठी कलाकारांना 80s रेट्रो ट्रेंडची भुरळ; सोनाली ते रितेश-जेनेलियाचे पाहा भन्नाट लूक

२०२९ आधीच मोदी-शहा पायउतार होणार, राऊतांच्या वक्तव्याने दिल्लीच्या राजकारणात मोठा भूकंप

Maharashtra News Live Update: सीजीपीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके मनोज जारंगे पाटील यांच्या भेटीला

High Blood Pressure: रात्रीच्या वेळी अचानक BP वाढतोय? झोपण्यापूर्वी ही 3 ड्रिंक्स प्या

8th Pay Commission : जुन्या पेन्शनर्ससाठी मोठी अपडेट! PM मोदींकडे थेट मागणी; 8व्या वेतन आयोगात होऊ शकतो बदल

SCROLL FOR NEXT