Pandharpur Crime News Saam tv
महाराष्ट्र

Pandharpur News: पंढरपुरात विठ्ठल दर्शनाचा काळाबाजार, भाविकाला 4000 रुपये घेऊन दिले व्हीआयपी दर्शन

Pandharpur Crime News: ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील भाविकांकडून प्रती व्यक्ती एक हजार रुपये घेऊन विठ्ठलाचे व्हीआयपी दर्शन दिल्याची घटना आज समोर आली आहे. यासंदर्भात शहापूर तालुक्यातील चेतन काबाडे या भाविकाने पोलिसामध्ये तक्रार दिली आहे.

भरत नागणे

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील भाविकांकडून प्रती व्यक्ती एक हजार रुपये घेऊन विठ्ठलाचे व्हीआयपी दर्शन दिल्याची घटना आज समोर आली आहे. यासंदर्भात शहापूर तालुक्यातील चेतन काबाडे या भाविकाने पोलिसामध्ये तक्रार दिली आहे. भाविकाच्या या तक्रारीवरून प्रती व्यक्ती एक हजार, असे एकूण चार हजार रूपये घेऊन व्हीआयपी दर्शन देणारा, तो व्यक्ती कोण होता, याचा शोध आता सुरू झाला आहे.

सलग सुट्ट्यांमुळे पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी आहे. मंदिरापासून जवळपास दोन किलोमीटर अंतरापर्यंत विठ्ठल पदस्पर्श दर्शन रांग गेली आहे. हजारो भाविक दर्शन रांगेत आहेत. त्यामुळे झटपट दर्शन मिळते का? याची चौकशी संबंधित भाविकांनी एका अनोळखी इसमाकडे केली असता, त्या इसमाने चार हजार रुपयांमध्ये चार जणांना झटपट दर्शन देतो, असे सांगितले. त्यानंतर संबंधित भाविकाने त्या इसमाला आपल्या गुगल पे वरून 4000 रुपये दिले.

पैसे मिळताच अर्ध्या तासांमध्ये त्या भाविकांना झटपट दर्शन मिळाले. दर्शन घेतल्यानंतर चेतन काबाडे या भाविकाने मंदिरातील पोलिसांकडे पैसे घेऊन दर्शन दिल्याची तक्रार दिली आहे. त्यांच्या या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित दलालाचा शोध सुरू केला आहे. पैसे घेऊन झटपट दर्शनासाठी सोडणारा इसम हा एका सत्ताधारी राजकीय पक्षाचा शहराध्यक्ष असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

मागील काही दिवसांपासून मंदिरामध्ये पैसे घेऊन दर्शनाला सोडल्याचे अनेक प्रकार सुरू असल्याची तक्रार दबक्या आवाजात सुरू होती. आजच्या या घटनेमुळे पैसे घेऊन दर्शन दिले जात असल्याची गंभीर घटना समोर आली आहे. विठ्ठल मंदिरामध्ये पैसे घेऊन दर्शनाला सोडणाऱ्या दलालांची मोठी साखळी आहे. अशा या लोकांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आता भाविकांमधून केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील थोडक्यात बचावले; पहिल्या मजल्यावरून लिफ्ट थेट जमिनीवर आदळली

महिनाभर १ चमचा चिया सिड्स खाल्ल्यास शरीरावर काय होतात परिणाम?

Jalna Crime : जालना हादरले; जुन्या वादातून तरुणाची हत्या, आई- वडिलांनाही बेदम मारहाण

Solar Eclipse: सूर्यग्रहणाच्या वेळी कोणत्या गोष्टी करु नये?

Sanjay Raut : राज-उद्धव ठाकरे एकत्र आल्याच्या धक्क्यातून फडणवीस सावरले नाहीत, संजय राऊतांचा टोला

SCROLL FOR NEXT