A tragic scene at Savalde Bridge where a 40-year-old man jumped into the Tapi River while locals attempted a rescue. Saam Tv
महाराष्ट्र

Shocking : पुलावरून तापी नदीत उडी मारणाऱ्या तरुणाचा मृत्यू; रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक VIDEO व्हायरल

Dhule Man Suicide Tapi River Bridge Video: सावळदे पुलावरून तापी नदीत उडी घेत 40 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना घडली. स्थानिकांनी नदीत बुडणाऱ्या तरुणाला वाचवायचे शर्थीचे प्रयत्न केले. या रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Omkar Sonawane

भूषण अहिरे, साम टिव्ही

धुळे : येथील सावळदे पुलावरून तापी नदीत उडी घेत एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्या करतानाचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. आत्महत्या करतानाचा हा सर्व थरार स्थानिकांनी मोबाईलमध्ये कैद केला.

शिरपूर येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील सावळदे पुलावरून तापी नदीत उडी घेत धुळ्यातील एका 40 वर्षीय व्यक्तीने आपली जीवनयात्रा संपवली आहे. परिसरातील नागरिकांनी संबंधित व्यक्तीला वाचविण्यासाठी प्रयत्न केले. परंतु संबंधित व्यक्तीकडून प्रतिसाद न मिळाल्यामुळे सदर व्यक्तीचा नदीच्या पात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नंदू दिलीप शेलार असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत असून, यामध्ये ही व्यक्ती नदीपात्रात बुडताना दिसतेय. विशेष म्हणजे घटना घडत असताना पुलावरील काही नागरिकांनी प्रसंगावधान राखून खाली दोरी सोडली आणि शेलार यांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, नंदू शेलार यांनी कुठलाही प्रतिसाद न दिल्याने डोळ्यांदेखत घडलेल्या या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण धुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

उन्हामुळे 5 एकरातील टरबूज झाले खराब, शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान

दरम्यान धुळे जिल्ह्यात दिवसेंदिवस उष्णतेचा पारा हा वाढत आहे. आज धुळे जिल्ह्यात 39 अंश इतके तापमान नोंदवले असून यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. वाढत्या उन्हामुळे शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान होत आहे. या उन्हाच्या कडाक्यामुळे धुळे जिल्ह्यातील निमझरी येथील दिनेश पाटील यांच्या 5 एकर शेतातील टरबूजाचे पिक खराब झाले.

या प्रचंड उन्हाचा फटका टरबूज फळाला बसल्यामुळे दिनेश पाटील यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. उन्हामुळे संपूर्ण शेतातील टरबूज खराब झाले असून टरबूजांवर पिवळे डाग बघायला मिळत आहे. 5 एकर क्षेत्रात टरबूज लागवडीसाठी दिनेश पाटील यांना 3 लाख रुपये इतका खर्च आला होता. अंदाजे जवळपास 100 टन टरबूजाचे उत्पन्न अपेक्षित होते. मात्र उन्हाच्या कडाक्यामुळे शेतकरी दिनेश पाटील यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL CSK vs DC: अखेर चेन्नई सुपर किंग्सनं उघडलं विजयाचं खातं; सॅमसन-ओव्हरटन ठरले हिरो

Asha Bhosle Health Update: आशा भोसले यांच्या नातनं दिली आजीच्या प्रकृतीची अपडेट; काय म्हणाली जनाई?

Sahyadri Express Loot: सिग्नलमध्ये बिघाड करुन सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडा; प्रवाशांचे मोबाईल, सोने लुटले

Sanju Samson Century: संजू सॅमसनचा जबरा तडाखा, फक्त ५२ चेंडूंत ठोकलं शतक; अनेक रेकॉर्ड उद्ध्वस्त, CSK चा धावांचा डोंगर

मोदी सरकारचा मोठा धक्का! डिझेलवरील निर्यात शुल्क वाढवला

SCROLL FOR NEXT