Wardha News Saam Tv
महाराष्ट्र

Wardha News : पुलाच्या कठड्यात बस अडकली; थरारक बस अपघातातून 40 प्रवासी बचावले

वर्ध्यात मोठी दुर्घटना टळली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चेतन व्यास

Wardha News: नाशिकमध्ये (Nashik) झालेल्या खासगी बस दुर्घटनेनंतर खासगी बस वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला होता. यानंतर राज्यातील बसच्या अपघातांची मालिकाही पाहायला मिळाली होती. त्यानंतर आता वर्ध्यात पुन्हा एकदा एका बसचा भीषण अपघात (Bus Accident) झाल्याची बातमी समोर येत आहे. या अपघातामुळे बसमधील सर्वच प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला होता. यावेळी बुसीमध्ये सुमारे 40 प्रवासी असल्याची माहिती समोर येत आहे. (Wardha Bus Accident Latest Update)

वर्धा जिल्ह्याच्या आर्वी -वर्धा मार्गांवरील येळाकेळी येथे अचानक एका बस चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि ही बस थेट पुलाच्या कठड्याला अडकली. बस कठड्याला अडकल्याने ही बस पुलाखाली कोसळतांना बचावली आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची ही बस वर्धेतून आर्विला चाळीस प्रवासी घेऊन जातं होती.

दरम्यान बस अचानक अनियंत्रित झाली आणी बस पुलाच्या कठड्याला धडकली. बसचा पुढचा एक चाक पुलाच्या खाली गेला. सुदैवाने या घटनेत सगळे प्रवासी सुखरूप असून काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहे. मात्र या अपघातात बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी चांगलीच गर्दी केली होती. या घटनेनंतर बसमधील प्रवासी आणी चालकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमुळे काही काळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र पोलिसांनी काही वेळातच वाहतूक सुरळीत केली. त्यामुळे मृत्यूच्या दाढेतून परत येणं काय असतं ते वर्ध्यातील एका प्रवाशी बसने प्रवास करणाऱ्या 40 प्रवाशांनी अनुभवलं आहे. 

Edited By -Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs South Africa: वर्ल्ड चॅम्पियन्सचा नाद करायचा नाय! भारताचा द.आफ्रिकेवर मोठा विजय; ३-१ ने मालिका जिंकली

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

SCROLL FOR NEXT