399 villages gets water from tanker in beed Saam Digitl
महाराष्ट्र

Beed Drought : बीड जिल्ह्यात दुष्काळाचे तीव्र चटके; 399 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू

या दुष्काळी परिस्थितीत बीडचा डोंबरी येथील साठवण तलाव बीड, पाटोदा, शिरूर कासार तालुक्याला वरदान ठरला आहे. या तालुक्यातील गावांना या तलावातून टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे.

विनोद जिरे

दुष्काळी बीड जिल्ह्यात आता पाणीटंचाईच्या तीव्र झळा सुरू झाल्या आहेत. बीड जिल्ह्यातील 143 लघु आणि मध्यम प्रकल्पापैकी 52 प्रकल्प आटले असून 54 प्रकल्प मृत साठ्यात आहेत, तर उर्वरित प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा आहे.

विशेष म्हणजे 3 जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारे मांजरा धरण देखील मृत साठ्यात आहे. यामुळे बीड जिल्ह्यातील गाव खेड्यात पाणी संकट निर्माण झाले असून आज घडीला जिल्ह्यातील 321 गावे व 293 वाड्यांना 399 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

महत्वाचं म्हणजे या दुष्काळी परिस्थितीत बीडचा डोंबरी येथील साठवण तलाव बीड, पाटोदा, शिरूर कासार तालुक्याला वरदान ठरला आहे. या तालुक्यातील गावांना या तलावातून टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: ...तर सरकारचा माज उतरवलाच पाहिजे; मनोज जरांगे पाटील कडाडले

Uddhav Thackeray: राजीनाम्यानं चालणार नाही, तर सरकार बदला; जंतर मंतरवरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

कार अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू; दुचाकीस्वाराला वाचवताना अनर्थ घडला!

राहुल-प्रियंका गांधींना 3 तासांनी पोलिसांनी सोडलं; सुटकेनंतरचा पहिला व्हिडिओ

Fact Check: देशातल्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनवर दगडफेक? CJP समर्थकांकडून हायड्रोजन ट्रेन टार्गेट?

SCROLL FOR NEXT