Nashik News: Saam tv
महाराष्ट्र

Nashik News: नाशिकमध्ये प्रसादातून विषबाधा, ३९ जणांची तब्येत बिघडली; परिसरात खळबळ

Nashik News: नाशिकच्या पेठमध्ये एका धार्मिक कार्यक्रमातील प्रसादातून नागरिकांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे.

Vishal Gangurde

अजय सोनवणे

Nashik News In Marathi

नाशिकमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकच्या पेठमध्ये एका धार्मिक कार्यक्रमातील प्रसादातून नागरिकांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. ३९ जणांना विषबाधा झाली आहे. विषबाधा झालेल्या नागरिकांना रुग्णालयात दाखल करत त्यांना उपचारांनंतर घरी सोडले आहे. (Latest Marathi News)

नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील उभीधोंड गावातील एका धार्मिक उत्सवात प्रसादातून ३९ जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. या गावातील ८ बाधित रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. तर ३१ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडले आहे.

नेमकं काय घडलं?

नाशिकच्या पेठ तालुक्यातील उभीधोंड येथील गावात धार्मिक उत्सवानिमित्त संपूर्ण ग्रामस्थांनी काल रात्री जेवण केले. मात्र आज सकाळच्या सुमारास ग्रामस्थांना उलटी,जुलाब याचा त्रास सुरु झाला. गावातील अनेक जणांना असा त्रास सुरू झाल्याने गावातील आशा वर्कर यांनी करंजाळी येथील प्राथमिक वैद्यकीय अधिकाऱ्यांना याची माहिती दिली.

यानंतर डॉक्टरांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचलं. त्यानंतर डॉक्टरांनी ३९ पैकी ३१ रुग्णांवर उपचार करत घरी सोडले. तर ८ रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच आमदार नरहरी झिरवाळ हे घटनास्थळी पोहोचत रुग्णांवर योग्य उपचार करण्याबाबत डॉक्टरांना सूचना दिल्या.

विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यात यश

पाण्याच्या शोधात निघालेला बिबट्या विहिरीत पडल्याची घटना नाशिकच्या चांदवड तालूक्याती बहादुरी येथे घडली आहे. पिकाला पाणी देण्यासाठी विहिरीवर गेलेल्या शेतकऱ्याला हा बिबट्या दिसला. त्यानंतर शेतकऱ्यांना चांदवड वनविभागाला माहिती दिली .

बिबट्याची माहिती मिळताच वनविभागाचं पथक घटनास्थळी पोहोचलं. त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीत पिंजरा टाकत बिबट्याला बाहेर काढण्यात यश मिळवलं. बिबट्या जेरबंद झाल्याने ग्रामस्थांनी व परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indigo Airplane : मधमाशांमुळे इंडिगो विमान उड्डाण रखडले, नेमकं काय घडलं? अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

Maharashtra Live News Update : सोलापूर शहरात पावसाची जोरदार बॅटिंग

Weight Loss: एका महिन्यात ४-५ किलो वजन कमी करता येतं का?

Bharat Bandh : मोठी बातमी! कोट्यवधी कामगारांकडून बुधवारी भारत बंदची हाक; शाळा, बँका, पोस्ट ऑफिस... काय बंद राहणार?

Mumbai Local : गर्दी टाळण्यासाठी कामाची वेळ बदला, ८०० कार्यालयांना शिफ्ट बदलण्याचे मध्य रेल्वेने केले आवाहन

SCROLL FOR NEXT