Cold Protection: बाळाला थंडीपासून वाचवण्यासाठी 'ही' एक चूक करताय, आताच अलर्ट व्हा, अन्यथा...

Babies Protection From Cold: सध्या थंडी खूप जास्त वाढत आहे. थंडीपासून वाचण्यापासून आपण घरात हीटर लावतो मात्र हीटरमुखे खूप त्रास होऊ शकतो. विशेषत लहान मुलांना हिटरमुळे धोका निर्माण होईल.
Cold Protection
Cold ProtectionSaam Tv
Published On
Summary

बाळाला थंडीपासून वाचवण्यासाठी ही गोष्टी करु नका

हीटरमुळे बाळाला होतो खूप त्रास

या गोष्टींची वेळीच काळजी घ्या

सध्या देशात खूप जास्त थंडी आहे. कडाक्याच्या थंडीत घराबाहेरदेखील पडता येत नाही. थंडीपासून वाचण्यासाठी स्वेटर, मफलर घालतात. परंतु तरीही थंडी वाचते. यावेळी अनेकजण काही ना काही उपाय करतात. यातील काही उपाय मात्र तुमच्या शरीरासाठी हानिकारक ठरु शकतात. विशेषत लहान मुलांना थंडीपासून वाचवण्यासाठी काहीही उपाय करु नका. यामुळे मुलांना धोका निर्माण होऊ शकतो.

Cold Protection
Baby Care Guide: दात येत असलेल्या लहान मुलांना 'या' गोष्टी देणे टाळाच

अनेकजण थंडीपासून वाचण्यासाठी घरात हिटर लावतात. मात्र, लहान मुले घरात असताना हिटर लावणे खूप धोकादायक ठरु शकते. गायनोकोलॉजिस्ट डॉक्टर उपासना सेतिया यांनी याबाबत माहिती दिली आहे.त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे.

फक्त एवढा वेळच हीटर सुरु ठेवा

एक्सपर्टने दिलेल्या माहितीनुसार, घरात लहान बाळ असताना हीटर, फिलामेंट रॉड किंवा ब्लोअर चालवणे खूप चुकीचे आहे. जर तुम्हाला हीटर लावायचा असेल तर त्याला खूप वेळ सुरु ठेवू नका. १ ते १.५ तासांनी हीटर बंद करा. यामुळे तुमचा रुम गरम होईल. परंतु पूर्णवेळी हीटर चालवणे हानिकारक आहे.

Cold Protection
Babies constipation: थंडी वाढली की बाळांना का होतं कॉन्स्टिपेशन? तज्ज्ञांनी सांगितली कारणं आणि सोपे उपाय

लहान बाळाला होऊ शकते स्कीन इन्फेक्शन

डॉक्टरांनी सांगितले की, गोधडीच्या आता झोपेत असताना ब्लोअर किंवा हीटर बाळाला चुकून लागला तर त्यामुळे काहीही होऊ शकते. हीटरमुळे बाळाला घुसमट होऊ शकते, त्याला श्वास घेताना त्रास होऊ शकतो. हीटरमुळे रुममधील ऑक्सिजन लेव्हल कमी होते. त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होईल. याचसोबत लहान मुलांची त्वचा खूप संवेदनशील असते. त्यामुळे स्कीनला त्रास होऊ शकतो.

Cold Protection
Liver Infection: लिव्हरला सूज आल्यानंतर दिसून येतात ५ लक्षणं; यकृताचं इन्फेक्शन ठरू शकतं जीवघेणं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com