Beed Crime News विनोद जिरे
महाराष्ट्र

Beed News: शेताच्या बांधावर गेला म्हणून तरुण शेतकऱ्याची हत्या, बीडमधील धक्कादायक घटना

बीडच्या कुसळंब गावातील शेतरस्त्याचा वाद विकोपाला..

विनोद जिरे

Beed News: बीड जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बीडमध्ये खुनाचे सत्र सुरूचं आहे. गेल्या 4 दिवसांपूर्वी परळी शहरात भर रस्त्यावर एकाचा मारहाण करत खून करण्यात आला होता.

ही घटना ताजी असतानाच शेताच्या बांधावरून का गेला म्हणत बीडच्या कुसळंब गावात 36 वर्षीय शेतकऱ्याचा डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली आहे. गोरख अजिनाथ पवार रा. कुसळंब ता. पाटोदा जि. बीड असं खून करण्यात आलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. (Latest Marathi News)

पाटोदा (Patoda) तालुक्यातील कुसळंब येथील शेतकरी (Farmer) आरोपी संतोष पवार वय 45 व गोरख आजिनाथ पवार वय 36 यांच्यामध्ये शेतात (Farm) जाणाऱ्या रस्त्यावरून वाद सुरू झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या दरम्यान संतोष पवार यांनी गोरख पवार यांच्या डोक्यात दगड मारल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी जामखेड (Jamkhed) येथे नेत असताना त्यांचा रस्त्यातच मृत्यू झाला.

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी अभिजित धाराशिवकर, एपीआय प्रताप नवघरे, पीएसआय राहुल पतंगे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी (Police) आरोपी संतोष पवारला ताब्यात घेतले असून, मृत गोरख यांच्या पत्नी शोभा पवार यांच्या फिर्यादीवरून पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज्यसभेच्या जागेसाठी नवनीत राणांचे प्रयत्न? मुख्यमंत्री भेटीमुळे चर्चांना उधाण

Mangalsutra Paan Design: वटपोर्णिमेसाठी ट्राय करा पानाचे सुंदर मंगळसूत्र, पाहा या ७ ट्रेंडी डिझाइन्स

Crime: अमरावती हादरले! बहिणीची छेड काढणाऱ्याला जाब विचारला, भरचौकात धारदार शस्त्राने वार करत तरुणाला जागीच संपवलं

Vidhan Parishad Election: राज्यभरात विधानपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी; कुठे बिनविरोध, कुठे होणार लढत

Monsoon Update 2026 : मान्सून सर्वात शेवटी कोणत्या राज्यात पोहोचतो? कारण जाणून घ्या

SCROLL FOR NEXT