Committee for milk Price : दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार, दूध दर निश्चितीसाठी शासनाकडून समितीची स्थापना

farmer News : दुग्धव्यवसाय विकास आयुक्त असणार असून यात सहकारी दूध संघाचे प्रतिनिधी, खासगी दूध संघाचे प्रतिनिधी अशी 10 जणांची समिती असणारआहे.
milk Price
milk PriceSaam TV
Published On

Mumbai News : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दूध दर निश्चितीसाठी शासनाने समिती स्थापन केली आहे. राज्यातील दूध दर प्रश्नाबाबत दूध उत्पादक, सहकारी व खाजगी दूध संघ, पशुखाद्य उत्पादक कंपन्या व शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत 22 जून रोजी कृषीमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.

या बैठकीत दुधाच्या दराबाबत चर्चा करण्यात आली. राज्यात दूध संकलन हे प्रामुख्याने खाजगी व सहकारी दूध संघांकडून करण्यात येते. दुधाच्या कृश काळात दूध उत्पादन कमी असल्याने, शेतकऱ्यांच्या दूधाला रास्त भाव मिळतो. मात्र दुधाच्या पुष्ट्ट काळात दूध उत्पादन वाढल्याने, विविध खाजगी व सहकारी दूध संघाकडून शेतकऱ्यांचे दूध कमी दरात स्वीकारले जाते.  (Latest Marathi News)

milk Price
Pune Crime News: कोयता हल्ल्यातून तरुणीला वाचवणाऱ्या दोघांवर होतोय कौतुकाचा वर्षाव; जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर केलं मोठं बक्षिस...

यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागतो. या सर्व बाबी लक्षात घेता, खाजगी सहकारी दूध संघांचा परिचालन खर्च (Operating Cost) तसेच दूध उत्सपादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च विचारात घेऊन, शेतकऱ्यांच्या दूधाला किमान भाव मिळावा या अनुषंगान दूधाचे दर निश्चित करण्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे. (Marathi Tajya Batmya)

milk Price
Maharashtra Politics: CM शिंदे, फडणवीस, अजित पवार आणि अशोक चव्हाण एकाच मंचावर येणार, नेमकं काय आहे कारण?

या समितीचे अध्यक्ष दुग्धव्यवसाय विकास आयुक्त असणार असून यात सहकारी दूध संघाचे प्रतिनिधी, खासगी दूध संघाचे प्रतिनिधी अशी 10 जणांची समिती असणारआहे. ही समिती दर तीन महिन्यानंतर बैठक घेऊन राज्यातील खाजगी व सहकारी दूध संघाकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाईच्या व म्हशीच्या दुधाला दिला जाणारा किमान दर निश्चित करतील. (Latest Political News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com