Corona | अलिबाग तालुक्यातील 36 गावे बनली कोरोना हॉटस्पॉट ! SaamTv
महाराष्ट्र

Corona | अलिबाग तालुक्यातील 36 गावे बनली कोरोना हॉटस्पॉट !

दुसरी लाट अजूनही संपली नसून अलिबाग अद्यापही या कोरोनाच्या विळख्यात अडकला आहे. रायगड जिल्ह्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण हे अलिबाग तालुक्यात आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजेश भोस्तेकर

रायगड : कोरोनाचा विळखा अजूनही घट्ट होताना दिसतोय. दुसरी लाट अजूनही संपली नसून अलिबाग अद्यापही या कोरोनाच्या विळख्यात अडकला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण हे अलिबाग तालुक्यात आहेत. 36 villages in Alibag taluka becomes Corona hotspot

अलिबाग तालुक्यात 219 गावे आहेत. यापैकी 36 गावांमध्ये दहा पेक्षा अधिक कोरोना बाधित रुग्णाची संख्या आढळून येत आहे. तर 109 गावात एकही कोरोनाचा रुग्ण नाही. तालुक्यातील या 36 गावांमध्ये ग्रामसेवकांनी तात्काळ कोव्हिड प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.

हे देखील पहा -

कोरोनाचा प्रादुर्भाव तालुक्यात वाढत असल्याने अलिबाग सध्या कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे. त्यामुळे तालुक्यातील कोरोना रुग्ण संख्या कमी करण्याचे आव्हान स्थानिक प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.

अलिबाग तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव हा अद्यापही कमी होताना दिसत नाही. कोरोना प्रादुर्भाव असलेली अनेक गावे व वाड्यावस्त्या प्रांताधिकारी यांच्या आदेशाने कोरोना बाधित क्षेत्र घोषित करून बंद करण्यात आली आहेत. गावागावात ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, महसूल विभागामार्फत कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात येत आहेत. नागरिकांची अँटीजन, आरटीपीसीआर चाचणी केली जात आहे.

कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचनाही प्रशासनाकडून केल्या जात आहेत. मात्र तरीही अलिबाग तालुक्यात कोरोना आटोक्यात आणण्यात प्रशासनाला यश येत नाही. अलिबाग तालुक्यात आतापर्यंत 17 हजार 95 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 15 हजार 343 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तालुक्यात 490 जणांचा कोरोना विषाणूने मृत्यू झाला आहे. अलिबाग तालुक्यात सद्यस्थितीत जिल्ह्यातील सर्वाधिक 1 हजार 262 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. पहिल्या लाटेत ज्या गावात कोरोना प्रादुर्भाव नव्हता अशी गावे दुसऱ्या लाटेत कोरोनाने बाधित झाली आहेत.

दहा पेक्षा अधिक रुग्ण असलेली गावे

आक्षी 35, आंबेपुर 18, बेलोशी 19, सारळ 16, वरसोली 23, मल्याण 11, वावे 42, चौल 39, शहाबाज 29, चेंढरे 88, धोकवडे 11, कामार्ले 17, शहापूर 15, पोयनाड 18, उसर 10, तळवलीतर्फे खंडाळा 28, वैजाळी 14, खिडकी 13, थळ 32, रेवदंडा 29, किहीम 25, कुरुळ 18, मानतर्फे झिराड 19, वाडगाव 12, रेवस 24, नागाव 30, परहूर पाडा 16, पेझारी 42, चिंचवली 16, कार्ले 14, हाशिवरे 14, भोंनग 11, सारळ 16, आंदोशी 24, गोंधळ पाडा 20, अलिबाग शहर 122

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shravan 2025 : श्रावण महिना कोणत्या तारखेपासून सुरु होतोय?

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या उगले दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान, CM फडणवीसांनी दिलं मोठं गिफ्ट

‘गब्बर के ताप से आपको सिर्फ गब्बरही बचा सकता है’; शिवसेनेच्या बड्या नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र

Rohtang Accident : भरधाव कार दरीत कोसळली; ४ जणांचा जागीच मृत्यू, वाहनाचा अक्षरश: चक्काचूर

Maharashtra Live News Update: प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारायणगडावर भक्तांनी घेतले विठुरायाचे दर्शन

SCROLL FOR NEXT