35 year old married woman dies of Thunderstorm shock in Sinnar Nashik ab95 अभिजीत सोनावणे
महाराष्ट्र

Nashik : अंगावर वीज पडून ३५ वर्षीय विवाहितेचा दुर्देवी मृत्यू

Nashik Accident News : शेतात चारा काढायला गेलेल्या उज्वला प्रदीप ढमाले या ३५ वर्षीय महिलेच्या अंगावर वीज कोसळली होती यात त्यांचा मृत्यू झाला आहे.

अभिजीत सोनावणे, साम टीव्ही, नाशिक

नाशिक: सिन्नर तालुक्यातील दुशिंगवाडी येथे आज सायंकाळी सात वाजेच्या सुमारास अंगावर वीज (Thunderstorm) पडल्याने एका विवाहितेचा दुर्देवी मृत्यू (Death) झाला आहे. शेतात चारा काढायला गेलेल्या उज्वला प्रदीप ढमाले या ३५ वर्षीय महिलेच्या अंगावर वीज कोसळली होती यात त्यांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी सायंकाळी पाच वाजेपासून सिन्नर (Sinnar) तालुक्याच्या पूर्व भागात सायाळे, मळढोण, पाथरे, मिरगाव, दुशिंगवाडी भागात विजांचा कडकडाट सुरू होता. जोराने वाहणारे वारे आणि पावसाळी ढगांनी गर्दी केली होती. (35-year-old married woman dies of Thunderstorm shock in Sinnar Nashik)

हे देखील पाहा -

दुशिंगवाडी शिवारात पान मळा रस्त्यावर ढमाले वस्ती असून प्रदीप ढमाले हे आपल्या कुटुंबासोबत वास्तव्यास आहेत. पावसाळी वातावरण तयार झाल्याने उज्वला ढमाले आणि त्यांची जाव माया प्रकाश ढमाले या दोघी एक किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतात जनावरांसाठी चारा काढत होत्या. त्या दरम्यान प्रचंड कडकडाट करत वीज कोसळली. जीव वाचवण्यासाठी दोघी दोन दिशांना झाडाच्या आडोशाला धावल्या. मात्र उज्वला यांना कोणतीही संधी मिळाली नाही. अंगावर वीज पडल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. ही घटना समजल्यावर नातेवाईक आणि ग्रामस्थांनी त्यांना तातडीने सिन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवले. तेथे उपचारासाठी दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'दम मारो दम' राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता नशा करण्यात दंग, 'तो' व्हिडिओ व्हायरल

Aayush Komkar: क्लासवरून घरी येत होता, बेसमेंटमध्ये दोघांकडून अंदाधुंद गोळीबार; आयुष कोमकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट

Anant Chaturdashi 2025 live updates : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून हेल्पलाइन नंबर जारी

Maharashtra Live News Update: प्रयागराजमध्ये गंगा आणि यमुना नदीच्या पाणी पातळीत वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

BMC Recruitment: बृहन्मुंबई महानरपालिकेत नोकरीची संधी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT