sangli, single use plastic
sangli, single use plastic saam tv
महाराष्ट्र

Single- Use Plastic Ban : सहा दुकानांच्या तपासणीत ५०० किलाे सिंगलयुज प्लास्टिक जप्त; ३५ हजारांचा दंड वसूल

विजय पाटील

सांगली : सिंगलयुज प्लास्टिकला बंदी (single use plastic ban) असताना देखील संबंधित साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात आल्याने (sangli) सहा दुकानांमध्ये (shop) तपासणी करुन सांगलीत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण आणि महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पाचशे किलो सिंगलयुज प्लास्टिक (single use plastic) जप्त केले आहे. या प्रकरणी एकूण पस्तीस हजार रुपयांचा दंड (fine) वसूल करण्यात आला आहे. (sangli latest marathi news)

महापालिकेने एक जुलै पासून सिंगलयुज प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर कारवाई सुरू करण्यात केली आहे. त्याचबरोबर प्लास्टिक विक्रेत्याकडून सिंगलयुज प्लास्टिकची वापर विक्री होऊ नये याबाबत कडक कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रात केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे लॅबोरेटरी प्रमुख अनंता एनएस त्यांच्यासमवेत सेंवंशी सूड, प्रदूषण नियंत्रण मंडळ सांगलीचे अधिकारी रोहिदास मातकर, महापालिकेचे पर्यावरण अभियंता अजित गुजराती, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर यांच्यासह सर्व स्वच्छता निरीक्षक यांनी पहिल्यांदा माॅल आण दुकानांना अचानक भेट देत तपासणी केली.

यावेळी विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या सिंगलयुज प्लास्टिकच्या पिशव्या आणि अन्य माल पथकाने जप्त केले. या कारवाईत स्वच्छता निरीक्षक प्रणिल माने, किशोर कांबळे, अंजली कुदळे, कोमल कुदळे, धनंजय कांबळे, गणेश माळी, वैभव कुदळे, नितीन कांबळे , राजू गोंधळे यांच्यासह मनपाचे कर्मचारी सहभागी झाले होते.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी येणार एकाच मंचावर? शिवाजी पार्कात होणार सभा

Bihar Wedding Viral News : अजब-गजब प्रेम कहाणी: विधूर जावयासोबत सासऱ्यानेच लावलं बायकोचं लग्न

May Month Horoscope: या राशींसाठी येणारे 30 दिवस ठरतील वरदान, मेष राशीत मंगळाचा प्रवेश ठरणार लाभदायक

Lok Sabha Election: पहिल्या दोन टप्प्यात भाजपला कमी मतदान? प्रचारासाठी आता BJP ने तयार केला नवीन गेम प्लॅन?

Kalyan Lok Sabha: राज ठाकरेंचे जे विचार आहेत, तेच आमचे विचार, मनसे शिवसेनेचा डीएनए एकच: श्रीकांत शिंदे

SCROLL FOR NEXT