Beed News Saam Tv
महाराष्ट्र

फेसबुकवर कारची जाहिरात करत 32 वर्षीय तरुणाला पावणेदोन लाखांचा गंडा

सहा विविध नंबरवरून कॉल करत बीड मधील 32 वर्षीय तरुणाला, जवळपास पावणेदोन लाख रुपयांचा गंडा घातला आहे.

विनोद जिरे

बीड - जिल्ह्यात ऑनलाइन फसवणूक, त्याचबरोबर विविध प्रलोभने दाखवून केलेल्या फसवणुकीच्या घटनेत, दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा असाच एक प्रकार बीडमध्ये समोर आला आहे. फेसबुकवर कारची जाहिरात करत, सहा विविध नंबरवरून कॉल करत बीड (Beed) मधील 32 वर्षीय तरुणाला, जवळपास पावणेदोन लाख रुपयांचा गंडा घातला आहे.

हे देखील पहा -

अविनाश वसंत सोनवणे 32 रा . धानोरा रोड , बीड असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. अविनाश सोनवणे हे एका खासगी फायन्सास कंपनीत काम करतात. 18 ते 19 मार्चच्या दरम्यान हा सर्व फसवणूकीचा प्रकार घडला आहे. अविनाश यांनी एका नामांकीत कंपनीच्या कार विक्रीची फेसबुकवर जाहिरात पाहिली. नंतर संबंधितांनी दिलेल्या एक दोन नव्हे तर 6 क्रमांकावर संपर्क साधला. त्या क्रमांकावरुन बोलणाऱ्या लोकांनी अविनाश यांना एक बँक खाते क्रमांक देवून, त्यावर 1 लाख 69 हजार रुपयांची रक्कम जमा करण्यास सांगीतले. त्यानुसार रक्कमही जमा केली.

मात्र नंतर त्या लोकांनी संपर्क केला नाही अन् कारही दिली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर, सोनवणे यांनी, बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात, फिर्याद दिली आहे. त्यावरुन अनोळखी 6 मोबाइल क्रमांक धारकांविरुध्द फसवणूक व माहिती तंत्रज्ञान अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस फसवणुकीचे प्रकार वाढल्याने, नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shakuntala Tai Nagarkar passed away: ज्येष्ठ लावणीसम्राज्ञीचं निधन; कर्करोगाशी प्रदीर्घ झुंज अखेर थांबली

कांदा, लसूणनंतर शाळेत मेथीवरही बंदी, मेथी आणणाऱ्या विद्यार्थ्याला 50 रुपयांचा दंड

जरांगे पाटलांची टीम आयटीच्या फेऱ्यात, जरांगेंच्या सहकाऱ्यांची आयकर चौकशी

राहुल गांधींचा फोन अन् भाजपचा प्लॅन फेल; राज्यातील बड्या नेत्याच्या पक्ष प्रवेशाला ब्रेक

भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यानं पक्षाला ठोकला रामराम, तडकाफडकी दिला राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT