मोहोळमधील 300 अंगणवाडी सेविकांनी प्रशासनाला मोबाईल दिले परत विश्वभूषण लिमये
महाराष्ट्र

मोहोळमधील 300 अंगणवाडी सेविकांनी प्रशासनाला मोबाईल दिले परत

मोबाइलचा दर्जा निकृष्ट असल्याने वेळोवेळी हे मोबाइल बंद पडत होते. त्यामुळे मोहोळमधील 300 अंगणवाडी सेविकांनी प्रशासनाला मोबाईल परत केले आहे.

विश्वभूषण लिमये

सोलापूर: अंगणवाडीचे कामकाज अधिक जलद आणि सुखकर व्हावे यासाठी मागच्या सरकारने अंगणवाडी सेविकांना मोबाइल दिले होते. मात्र त्या मोबाइलचा दर्जा निकृष्ट असल्याने वेळोवेळी हे मोबाइल बंद पडत होते. त्यामुळे मोहोळमधील 300 अंगणवाडी सेविकांनी प्रशासनाला मोबाईल परत केले आहे. (300 Anganwadi workers from Mohol returned mobile phones to the administration)

हे देखील पहा -

या मोबाईलची दुरुस्ती करायलाच चार ते पाच हजारांचा खर्च यायचा, असा आरोप करत सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील तब्बल 300 अंगणवाडी सेविकांनी हे मोबाइल प्रशासनाला परत केले आहेत. अंगणवाडी सेविकांच काम हे किचकट असल्याने त्यात सुधारणा व्हावी म्हणून हे मोबाइल देण्यात आले होते. मात्र या मोबाइलवरती काम करण्यासाठी देण्यात येणारा प्रोत्साहन भत्ताही शासनाकडून वेळेवर मिळत नसल्याने अंगणवाडी सेविकांनी अनेक तक्रारी केल्या आहेत.

दरम्यान, सदरील मोबाइलची वॉरंटी संपल्याने, हे मोबाइल शासनाने परत घेऊन त्याऐवजी अद्यावत मोबाइल आणि वेळेवर भत्ता अंगणवाडी सेविकांना देण्यात यावा अशी मागणी केली जात आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope : परिस्थितीशी दोन हात करावे लागणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात मोठं काही तरी घडणार

Aravallis Hills: अरवली पर्वतरांगांबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय; खाणकामावर पूर्णपणे बंदी, राज्यांना आदेश

Belly Fat: वयाच्या तिशीनंतरच का वाढतो पोटाचा घेर? जाणून घ्या 'चरबी' वाढण्याची ४ कारणे

Maharashtra Live News Update: चित्रपट दिग्दर्शक सयाजी शिंदेंनी उभा केलेल्या देवराईला अचानक आग

'वंचित' आणि MIM ने निवडणुकीसाठी रणशिंग फुकलं; उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणाला कुठून मिळाली संधी?

SCROLL FOR NEXT