Amaravati News Saam tv
महाराष्ट्र

Amaravati News: अमरावती हिंसाचार प्रकरण, भाजपचे अनिल बोंडे, प्रवीण पोटे यांच्यासह ३० आरोपींची निर्दोष सुटका

Amaravati News: अमरावती हिंसाचार आरोपातून भाजपचे अनिल बोंडे, प्रवीण पोटे यांच्यासह ३० नेत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

साम टिव्ही ब्युरो

अमर घटारे

Amravati Crime News: अमरावती हिंसाचार आरोपातून भाजपचे अनिल बोंडे, प्रवीण पोटे यांच्यासह ३० नेत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अमरावती हिंसाचार प्रकरणातून भाजपच्या अनिल बोंडे, प्रवीण पोटे, शिवराय कुळकर्णी यांची निर्दोष सुटका झाली आहे. (Latest Marathi News)

काय आहे प्रकरण?

कथित त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ 12 नोव्हेंबर 2021 रोजी रजा अकादमी इस्लामिक फेडरेशन संघटनेच्या वतीने अमरावतीत मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चातील लोकांनी दुकानांची तोडफोड केली होती, त्याचाच निषेध म्हणून निषेधार्थ दुसऱ्या दिवशी 13 नोव्हेंबरला भाजपा व हिन्दु संघटनांनी अमरावती शहर बंदचे आयोजन केले होते.

शहर बंद पुकारण्यात आला, त्यावेळी राजकमल चौक येथे अमरावती शहराचे भाजपा नेते आमदार प्रविण पोटे,खासदार अनिल बोंडे, भाजपा प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, तुषार भारतीय, जगदीश गुप्ता यांनी जमावाला संबोधित केले. यानंतर शहरात मोठ्या प्रमाणात जाळपोळ,दगडफेक झाली होती.

भाजपच्या आंदोलनाला हिसंक वळण लागले होते,तर पोलिसांकडून सहा वेळा लाठीचार्ज झाला होता. तर यात भाजप नेत्यावर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते, तर जिल्हा व सत्र न्यायालयात यात प्रकरण सुरू असताना न्यायालयाने दोनच वर्षात या प्रकरणाचा निकाल लावत सर्व भाजप नेते सह ३० जणांची निर्दोष मुक्तता केली.

भाजपा व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर १४३, १४७, १४८, १४९, २६९, २७०, १८८, १५३, १५३ (अ), ३३२, ३३६, ३५३, ४२७, ४३५, १३५ महाराष्ट्र पोलीस कायदा ४,२५ आर्म अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करून खासदार अनिल बोंडे, आमदार प्रविण पोटे, जगदीश गुप्ता, भाजपा प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, तुषार भारतीय व इतर भाजप कार्यकर्ता विरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते.

या प्रकरणाचे आरोपी तर्फे ॲड. प्रशांत देशपांडे यांनी संपूर्ण कामकाज पाहिले. या प्रकरणी अभियोजन पक्षा तर्फे एकूण ६ साक्षीदार तपासण्यात आले. सर्व साक्षदारांची उलट तपासणी आरोपीतर्फे ॲड. प्रशांत देशपांडे यांनी घेतली.

ॲड. प्रशांत देशपांडे यांच्या नेतृत्वात ॲड. मोहित जैन, ॲड. गणेश गंधे यांनी जोरदार युक्तिवाद केला. मविआ सरकारने भाजपा व हिंदुत्ववादी कार्यकर्त्याविरुद्ध सुडाच्या भावनेने दाखल केलेल्या सर्व खटल्यात ॲड. प्रशांत देशपांडे यांनीच हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची बाजू मांडली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, मंत्री नरहरी झिरवाळ यांचा इशारा

Boondi Ladoo Recipe: या भाऊबीजनिमित्त भावाला द्या खास मिठाई; झटपट बनवा हॉटेल स्टाईल बूंदीचे लाडू

Shilpa Shetty Photos: लाल साडी अन् सडपातळ कंबर, शिल्पाच्या सौंदर्याने केले घायाळ

Rain : राज्यात अनेक ठिकाणी परतीच्या पावसाने झोडपलं; नांदेड जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट

Heart Attack: सकाळची ही सवय वाढवते हार्ट अटॅकचा धोका; रक्तवाहिन्या का होतात ब्लॉक?

SCROLL FOR NEXT