Jalna Accident Saam Tv
महाराष्ट्र

Jalna Accident: दुर्दैवी! शॉपिंग करून मॉलबाहेर पडले अन् अनर्थ घडला; कारच्या धडकेत ३ चिमुकल्यांचा मृत्यू

Priya More

लक्ष्मण सोळुंके, जालना

Jalna News: जालनामध्ये दुचाकी आणि कारच्या अपघातामध्ये (Jalna Accident) तीन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मॉलमध्ये शॉपिंग (Shopping Mall) करुन घराच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला आहे. जालना शहरातील मंठा-अंबड बायपास मार्गावरील रेल्वे उड्डाणपुलावर ही घटना घडली आहे. या अपघाताचा तपास पोलिसांकडून (Jalna Police) सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जालना शहरातील अंबड चौफुली ते मंठा चौफुली दरम्यानच्या रेल्वे उड्डान पुलावर हा भीषण अपघात झाला. कारने दुचाकीला जोरदारच्या धडक दिली. या अपघातामध्ये तीन मुलांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाले. नागरिकांनी तात्काळ जखमींना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल केले. या अपघातामध्ये नुरेन फातेमा सादेक शेख (7 वर्षे), आयेजा फातेमा सादेक शेख (5 वर्षे), अदाबिया फातेमा सय्यद शोएब (9 वर्षे) यांचा मृत्यू झाला. तर सय्यद शोएब आणि अन्य एक मुलगा जखमी झाला आहे.

रविवारची सुट्टी असल्याने तट्टूपुरा मुजाहेद चौक येथे राहणारे सय्यद शोएब हे आपल्या मुलांसोबत दोन भाच्यांना मोतीबागेत खेळण्यासाठी घेऊन गेले होते. या मुलांचे खेळून झाल्यानंतर ते शॉपिंगसाठी त्यांना मॉलमध्ये घेऊन गेले.

शॉपिंग झाल्यानंतर ते संध्याकाळी साडेसातच्या सुमारास मॉलमधून बाहेर पडले आणि दुचाकीवरुन घराकडे जात होते. त्याचवेळी रेल्वे उड्डाण पुलावर त्यांच्या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली. या अपघातात सर्वजण रस्त्यावर पडले. या अपघातामध्ये तीन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला. तर सय्यद शोएब आमि एक मुलगा जखमी झाला.

सय्यद शोएब यांच्या डोळ्यासमोरच त्यांची मुलगी आणि दोन भाच्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरुन फरार झाला. अपघातामध्ये सय्यद शोऐब आणि एक मुलगा हे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर जालन्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सय्यद शोऐब यांच्या घरावर शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. जालना पोलीस या अपघाताचा तपास करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT