Samruddhi Mahamarg Accident Update News SAAM TV
महाराष्ट्र

Samruddhi Highway Accident : एकुलता एक कमावता मुलगा, बहिणीला माहेरी आणायला निघाला; काळानं हिरावला, अख्खं गाव हळहळलं

Samruddhi Mahamarg Accident Update News : बुलडाण्यातील सिंदखेडराजाजवळ समृद्धी महामार्गावर मध्यरात्री बस अपघातात २६ प्रवासी मृत्युमुखी पडले.

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

चेतन व्यास, वर्धा

Samruddhi Mahamarg Accident Update News : बुलडाण्यातील सिंदखेडराजाजवळ समृद्धी महामार्गावर मध्यरात्री बस अपघातात २६ प्रवासी मृत्युमुखी पडले. कुणाचे आई-वडील, कुणाचे बहीण भाऊ, कुणाचे नातेवाईक, कुणाचा मुलगा या काळानं हिरावला. यात वर्धामधील सेलू तालुक्यातल्या झडशी गावातील करण बुधबावरे हा देखील होता.

करण घरातला एकुलता एक कमावता मुलगा. वय अवघं २८ वर्षे. मुंबईत राहणाऱ्या बहिणीला माहेरी आणायला गेलेल्या करणवर काळानं झडप घातली. त्याच्या आईवर तर दुःखाचा डोंगर कोसळलाय. तर त्याच्या आईच्या जीवाला काय वाटलं असेल, या विचारानंच अख्खं गाव हळहळलं. (Accident News)

समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg Accident) खासगी बसला अपघात झाला. या बसमधून प्रवास करणाऱ्या २६ जणांसाठी ही काळरात्र ठरली. या अपघातातील मृतांमध्ये वर्धामधील सेलू तालुक्याच्या झडशी येथील रहिवासी करण पुरुषोत्तम बुधबावरे (वय २८) याचाही समावेश आहे.

करण हा आखाडीसाठी मुंबई येथे राहणाऱ्या बहिणीला माहेरी आणायला निघाला होता. पुण्याला तो मित्राच्या घरी राहणार होता. त्यानंतर मुंबईला जाऊन बहिणीला घरी घेऊन जाणार होता. पण त्याआधीच बहिणीच्या एकुलत्या एक भावाला काळानं तिच्यापासून हिरावलं.

५ वर्षांपूर्वीच वडिलांचं निधन

करण याचे वडील पुरुषोत्तम यांचे पाच वर्षांपूर्वीच अल्पशा आजाराने निधन झाले होते. करणची आई शेतमजुरी करते. फेब्रुवारी महिन्यात त्याच्या लहान बहिणीचं लग्न झालं होतं. घरात तो आणि आई असे दोघेच होते. संपूर्ण घराचा भार करणच्या खांद्यावर होता. वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या जागी करणची टपाल खात्यात पोस्टमनपदावर मागील वर्षी नियुक्ती झाली होती. त्याच्या अपघाती मृत्यूनं आईवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर अख्ख्या गावावर शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pillow Talk: पिलो टॉक म्हणजे काय? नवरा- बायकोसाठी का महत्त्वाचे आहे?

Maharashtra Live News Update: मालाडमध्ये १४ वर्षीय मुलाने घेतले जीवन संपवण्याचे टोकाचे पाऊल

डर्टी बाबाचा डर्टी पिक्चर! चैतन्यानंद सरस्वतीच्या इन्स्टिट्यूटमध्ये सापडलं सेक्स टॉय अन् पॉर्न व्हिडिओच्या पाच सीडी

Thusrday Horoscope : विजयादशमी असली तरी आयुष्यात अडचणी येणार; ५ राशींच्या लोकांच्या नशिबात संकटे

KamaltaI Gawai : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला जाणार का? सरन्यायाधीशांच्या मातोश्री कमलताई गवईंनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT