Samruddhi Mahamarg Accident: नोकरीसाठी पुण्याला निघालेल्या अवंतीवर काळ कोपला; मला तिच्याकडे घेऊन चला म्हणत आईने फोडला टाहो

Avanti Pohanikar Death In Samruddhi Mahamarg Accident: अवंती पोहनीकर ही वर्ध्याची असून ती इंजिनिअर होती. पुण्याला जाण्यासाठई शुक्रवारी सायंकाळच्या खासगी ट्रॅव्हल्सने ती निघाली होती.
Engineer Avanti Pohanikar Death in Samruddhi Mahamarg Accident at buldhana
Engineer Avanti Pohanikar Death in Samruddhi Mahamarg Accident at buldhanasaam tv
Published On

>>चेतन व्यास, साम टीव्ही

Samruddhi Mahamarg Accident At Buldhana : बुलढाणा येथील समृद्धी महामार्गावर मध्यरात्री खासगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. या अपघातात बस उलटून डिझेल टँक फुटल्याने बसला आग लागली आणि झोपेतच २६ जणांचा होरपळून मृत्यू झाला. या अपघातात अनेकांनी आपली मुलं, नातेवाईक गमावली, तर काहींचं अख्खं कुटुंब गेलं. यापैकीच अवंती पोहनीकर ही तरुणी देखील होती. अवंतीचा या अपघातात होरपळून मृत्यू झाला. तिच्या अशा अकाली जाण्याने तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

अवंती पोहनीकर ही वर्ध्याची असून ती इंजिनीअर होती. पुण्याला जाण्यासाठई शुक्रवारी सायंकाळच्या खासगी ट्रॅव्हल्सने ती निघाली होती. परंतु मध्यरात्री बुलढाणा येथे समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात तिचा मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच अवंतीच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली. (Breaking News)

Engineer Avanti Pohanikar Death in Samruddhi Mahamarg Accident at buldhana
Samruddhi Mahamarg Accident: दोन जीवलग मैत्रिणींचा शेवटही सोबतच, समृद्धीवरील अपघातात नियतीचा क्रूर खेळ

अपघाताची माहिती मिळाली तेव्हा आपली मुलगी ठीक असेल ना, तिला काही झालं तर नसेल या भीतीने आईच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते. मला अवंतीजवळ घेऊन चला, असं म्हणत तिच्या आईने टाहो फोडला. त्या माऊलीला तर हे देखील माहिती नाव्हतं की तिची अवंती आता या जगात नाही. ती तिला सोडून गेली आहे. (Marathi Tajya Batmya)

Engineer Avanti Pohanikar Death in Samruddhi Mahamarg Accident at buldhana
Buldhana Bus Accident: मोठी बातमी! समृद्धी अपघातप्रकरणी बस चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

अवंतीच्या वडिलांचं ती लहान असतानाच निधन झालं. त्यानंतर तिची आई प्रणिता यांनीच अवंती आणि तिची बहीण मोनू यांचा सांभाळ केला. प्रणिता या मेघे विद्यापिठात कार्यरत असल्याची माहिती आहे. आईची प्रकृती बरी नसते म्हणून अवंती परदेशी गेली नाही. तिने एक मॉडेल म्हणून खूप प्रसिद्धीही मिळवल्याची माहिती आहे. ती नोकरीच्या निमित्तानेच पुण्याला जात होती. पण वाटेत काळाने तिच्यावर घाला घातला. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com