2.5 lakhs devotees in pandharpur on eve of kartiki ekadashi 2023 saam tv
महाराष्ट्र

Kartiki Ekadashi 2023 : कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूरात भाविकांची अलाेट गर्दी, प्रसादाच्या लाडूची जाेमात विक्री (पाहा व्हिडिओ)

भारत नागणे

Pandharpur Kartiki Wari News :

उद्या पंढरपुरात कार्तिकी यात्रेचा (kartiki wari) सोहळा साजरा होणार आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक पंढरीत येऊ लागले आहेत. आज (बुधवार) पंढरपुरात सुमारे अडीच लाख भाविक दाखल झाले आहेत. (Maharashtra News)

कार्तिकी यात्रेच्या (Kartiki Ekadashi 2023) निमित्ताने प्रशासनाने पंढरपूरात जय्यत तयारी केली आहे. त्यातच सकल मराठा समाजाने विठ्ठलाच्या शासकीय महापूजा विरोधात पुकारलेले आंदोलन मागे घेतल्याने महापूजेचा पेच आता सुटला आहे. उद्या पहाटे अडीच वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (deputy cm devendra fadnavis) यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती मंदिर समितीने दिली.

दरम्यान कार्तिकीच्या निमित्ताने पंढरपूर मध्ये विठ्ठल नामाचा जयघोष सुरू आहे. विठ्ठलाची पदस्पर्श दर्शनाची रांग मंदिरापासून अडीच किलोमीटर अंतरावर गेलेली आहे. दर्शनासाठी सहा ते सात तासांचा अवधी लागत आहे.

भाविकांसाठी विठुरायाचा प्रसाद म्हणून लाडू

कार्तिकी एकादशी व यात्रेनिमित्त मंदिर समितीने दहा लाख लाडू तयार केले आहेत. काजू, बदाम, बेदाणा, विलायची अशा पौष्टीक सुका मेव्यांचा वापर करून बुंदी लाडू प्रसाद तयार केला आहे. पौष्टिक व शक्ती वर्धक विठुरायाच्या लाडू प्रसादाला भाविकांमधून मोठी मागणी वाढली आहे. दोन दिवसात एक लाख लाडू प्रसादाची विक्री झाली आहे.

मंदिर समितीकडून भाविकांना अल्प दरात लाडू प्रसादाची विक्री केली जाते. यापूर्वी मंदिर समिती ठेकेदारांकडून लाडू प्रसाद तयार करून घ्यायची. यंदा मात्र मंदिर समितीने स्वतः लाडू प्रसाद तयार करण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे लाडू प्रसाद विक्रीतून समितीला‌ चांगला फायदा झाला आहे. त्यामुळे मंदिर समितीने भाविकांना पौष्टीक आणि शक्ती वर्धक लाडू प्रसाद देण्याचा निर्णय घेतला आहे.

कार्तिकीसाठी सात ते आठ लाख भाविक येतील असा अंदाज आहे. त्यादृष्टीने दहा लाख बुंदीचे लाडू तयार करण्याचे वेगाने काम सुरू आहे. यासाठी 200 पोती हरभरा डाळ, 300 पोती साखर, 150 डबे शेंगदाण तेल वापरण्यात आले आहे. शिवाय काजू,बदाम,बेदाणा,विलायची या सुक्या मेव्याचा ही प्रमाणात वापर केला आहे.

बुंदी लाडू प्रसादामध्ये‌‌ प्रथमच सुक्या मेव्याचा वापर केल्याने लाडू प्रसादाची गुणवत्ता वाढली आहे. शिवाय भाविकांच्या आरोग्यासाठी पौष्टिक आणि शक्ती वर्धक असल्याने प्रसादाला मोठी मागणी वाढली आहे.

140 ग्राम वजनाच्या दोन लाडूची 20 रूपयांना विक्री केली जाते. लाडू प्रसाद बनवण्यासाठी जवळपास 100 स्वयंसेवक मागील आठ दिवसांपासून अहोरात्र काम करत आहेत. बुंदी लाडू प्रसादा बरोबरच दोन लाख राजगिरा लाडू देखील तयार करण्यात आले आहेत. भाविकांनी लाडू प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: 'महाराष्ट्रात काँग्रेसचा मुख्यमंत्री...' बाळासाहेब थोरातांनी सांगितली 'मन की बात'; राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या

BARC Recruitment: भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; पात्रता काय? अर्ज कसा कराल?

Soan Papdi Recipe : जिभेवर ठेवताच विरघळेल अशी सोनपापडी; घरच्याघरी कशी बनवायची

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांचा वेगवान आढावा

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT